रत्नागिरीत 6 गर्भवतींना कोरोना, 14 गरोदर मातांसह नवजात बालकांच्या चाचण्या

| Updated on: Jun 28, 2020 | 12:43 PM

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या 6 मातांनाच कोरोना संसर्ग झाला आहे (Pregnant women infected with Corona in Ratnagiri).

रत्नागिरीत 6 गर्भवतींना कोरोना, 14 गरोदर मातांसह नवजात बालकांच्या चाचण्या
Follow us on

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा संसर्ग लहान मुलं, वयोवृद्ध आणि गरोदर मातांना होऊ नये यासाठी आरोग्य खात्याने विशेष लक्ष दिलं आहे. मात्र, असं असतानाही रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या 6 मातांनाच कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Pregnant women infected with Corona in Ratnagiri). प्रसुतीगृहातील एका नर्सला देखील कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय हाय अलर्टवर आले आहे. गरोदर मातांसोबतच आता नवजात बालकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न तयार झाला आहे.

6 गरोदर मातांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणि या ठिकाणाशी संबंधित 14 गरोदर मातांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 14 गरोदर मातांसह काही नवजात बालकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हेही तपासले जाणार आहे. त्यामुळे आता या नवजात बालकांच्या कोरोना चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 556 वर पोहचली आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 424 इतकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 109 आहे. रत्नागिरीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 24 इतकी आहे. जिल्ह्यात 48 अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 183 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

राज्यात काल (27 जून) दिवसभरात तब्बल 5 हजार 318 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Update).

दिवसभरात 4 हजार 430 रुग्ण बरे

राज्यात काल दिवसभरात 4 हजार 430 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 84 हजार 245 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 52.94 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या राज्यात 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनामुळे 7273 रुग्णांचा मृत्यू

राज्यात काल दिवसभरात 167 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी 86 रुग्णांचा मृत्यू गेल्या 48 तासांमधील तर उर्वरित 81 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्याचा मृत्यूदर 4.57 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 7 हजार 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

पुणे शहरातील सलून सशर्त सुरु, कोणत्या गोष्टींना सूट, कोणत्या गोष्टींवरील बंदी कायम?

प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर, 20 वारकऱ्यांसह पंढरपूरची पालखी बसने मार्गस्थ होणार

मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या भागात किती?

Pregnant women infected with Corona in Ratnagiri