पुणे शहरातील सलून सशर्त सुरु, कोणत्या गोष्टींना सूट, कोणत्या गोष्टींवरील बंदी कायम?

राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या निर्णयानंतर आजपासून (रविवार, 28 जून) पुणे शहरातील सलून सशर्त सुरु होत आहेत (Saloons in Pune starting with terms).

पुणे शहरातील सलून सशर्त सुरु, कोणत्या गोष्टींना सूट, कोणत्या गोष्टींवरील बंदी कायम?

पुणे : राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या निर्णयानंतर आजपासून (रविवार, 28 जून) पुणे शहरातील सलून सशर्त सुरु होत आहेत (Saloons in Pune starting with terms). सरकारी निर्णयानंतर कंटेनमेंट झोन बाहेरची केश कर्तनालये सुरु होणार आहेत. यावेळी केशकर्तन, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडींग सेवा देता येतील. मात्र, दाढी, मसाज त्वचेशी निगडित सेवा देण्यास मनाई आहे. कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अ‍ॅप्रॉन आणि मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. दुकानात खुर्च्या, रिकाम्या जागा, फरशीसह इतर ठिकाणी दर 2 तासांनी निर्जंतूक करणं आवश्यक आहे. ग्राहकांसाठी केवळ एकदाच वापरात येणारे डिस्पोजल टॉवेल, नॅपकिन बंधनकारक करण्यात आले आहेत.

सलूनच्या दर्शनी भागात याबाबतचा फलक लावणे आवश्यक आहे. ग्राहकांसाठी मास्क वापरणं बंधनकारक आहे. फिजिकल डिस्टन्स देखील आवश्यक आहे. कटिंग व्यतिरिक्त इतर सेवा घेतल्यास कारवाई होणार आहे. महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने सरकारच्या सूट देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, प्रत्येक सलून व्यवसायिकास 1 लाख रुपये रोख आर्थिक मदत आणि आत्महत्या केलेल्या व्यवसायिकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची त्वरित आर्थिक मदतीची मागणी असोसिएशनने केली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी (27 जून) दिवसभरात तब्बल 996 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 20,023 इतकी झाली आहे. काल जिल्ह्यात 19 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या 693 पर्यंत पोहचली आहे. उपचारानंतर बरे झाल्याने काल 567 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दुसरीकडे पुणे शहरात (पुणे मनपा हद्दीत) शनिवारी दिवसभरात 19 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात 591 बाधित रुग्ण दगावले आहेत. तर दिवसभरात 822 कोरोना बाधित नवीन रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंत 15,602 जणांना कोरोनाची बाधा झाली. काल 486 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 9,119 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 5 हजार 892 रुग्ण कोरोना अ‍ॅक्टिव्ह आहेत. 308 रुग्ण क्रिटिकल आणि 65 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

हेही वाचा :

CORONA | पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, आरोग्यमंत्र्यांच्या सूचना, नेमका ‘मुंबई पॅटर्न’ काय?

मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या भागात किती?

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 5318 नवे कोरोनाबाधित, तर 4430 रुग्णांची कोरोनावर मात

Saloons in Pune starting with terms

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *