AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra | ‘देसी गर्ल’च्या नावावर आणखी एक विक्रम, प्रियांकाचे आत्मचरित्र अमेरिकेच्या ‘बेस्टसेलर’ यादीत!

प्रियांका चोप्राचे आत्मचरित्र ‘अनफिनिश्ड’ अमेरिकेत प्रकाशित झाले असून, 12 तासांत त्याची सर्वाधिक विक्री झाली आहे.

Priyanka Chopra | ‘देसी गर्ल’च्या नावावर आणखी एक विक्रम, प्रियांकाचे आत्मचरित्र अमेरिकेच्या ‘बेस्टसेलर’ यादीत!
| Updated on: Oct 03, 2020 | 4:29 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘देसीगर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास (Priyanka Chopra) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने तिचे आत्मचरित्र ‘अनफिनिश्ड’ची (Unfinished) घोषणा केली होती. तिचे हे पुस्तक अमेरिकेत (America) प्रकाशित झाले असून, 12 तासांत त्याची सर्वाधिक विक्री झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या ‘बेस्टसेलर’ पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाचा समावेश झाला आहे (Priyanka Chopra Book Unfinished included in bestseller books of America).

’12 तासांपेक्षा कमी वेळात अमेरिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. मला आशा आहे की, तुम्हा सगळ्यांना हे पुस्तक खूप आवडेल’, असे म्हणत प्रियांकाने (Priyanka Chopra) आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘टॉप 10’ पुस्तकांची यादी शेअर करत तिने ही गुडन्यूज आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

प्रियांकाने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर संपूर्ण जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तिचे चाहते या पोस्टवर कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. प्रियांका आपल्या ‘अनफिनिश्ड’ (Unfinished) या पुस्तकाबद्दल खूप उत्साही होती. नेहमी व्हिडीओ, फोटो शेअर करून ती या पुस्तकाविषयी सांगत होती. (Priyanka Chopra Book Unfinished included in bestseller books of America)

‘अनफिनिश्ड’ हे नाव तिने पुस्तक सुरुवात करण्याच्या आधीच ठरवले होते. या बद्दल सांगताना ती म्हणते, ‘गेली 20 वर्ष इंडस्ट्रीत काम करताना माझ्याकडे एक भली मोठी यादी तयार झाली होती. ही यादी मला वैयक्तिक आणि प्रोफेशनली या दोन्ही बाजूंनी तपासायची होती. आणि म्हणूनच मी अजूनही स्वतःला ‘अनफिनिश्ड’ (अपूर्ण) समजते. म्हणून या पुस्तकाचे नाव देखील ‘अनफिनिश्ड’ आहे.’

सोशल मिडीयाच्या माध्यमातून आत्मचरित्राची घोषणा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमीच आपल्या हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. प्रियांकाने या पुस्तकाच्या कव्हर पेजचे छायाचित्र शेअर करत, आपण स्वतःच्या आयुष्यावर आत्मचरित्र लिहिले असून, हे पुस्तक लवकरच प्रकाशित करणार असल्याची घोषणा तिने ट्विटरवरून केली होती. या पुस्तकामुळे प्रियांकाच्या आयुष्यातील खासगी गोष्टी माहिती करून घेण्याची नामी संधी आता तिच्या चाहत्यांसाठी चालून आली आहे.

प्रियांकाने वयाच्या १७व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचा हा प्रवास खूपच रंजक ठरला आहे. मिस इंडिया ते बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ होण्याचा प्रवास खूप कठीण होता. यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्येही आपला अभिनयाची चुणूक दाखविली. आज ती इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनाससह लग्नगाठ बांधून प्रियांका अमेरिकेत स्थायिक झाली आहे.

(Priyanka Chopra Book Unfinished included in bestseller books of America)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.