Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षण पथकाचा निषेध, जोरदार घोषणाबाजी, व्हिडीओग्राफीवर मुस्लिम पक्षाचा आक्षेप

| Updated on: May 06, 2022 | 6:36 PM

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसरात पोहोचलेल्या सर्वेक्षण पथकाविरोधात घोषणाबाजी सुरू झाली आहे. एका बाजूने घोषणाबाजी केल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे वातावरण तापले. मात्र, पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत केले.

Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षण पथकाचा निषेध, जोरदार घोषणाबाजी, व्हिडीओग्राफीवर मुस्लिम पक्षाचा आक्षेप
ज्ञानवापी मशीद परिसर
Image Credit source: tv9
Follow us on

वाराणसी : उत्तर प्रदेशमध्ये, वाराणसी (Varanasi) जिल्ह्यातील ज्ञानवापी मशीद परिसर आणि शृंगार गौरी मंदिर वादात न्यायालयाच्या आदेशानुसार आज टीम सर्वेक्षणासाठी पोहोचली. यादरम्यान वकील आयुक्त अजयकुमार मिश्रा यांच्या देखरेखीखाली व्हिडिओग्राफी करावी लागणार आहे. त्याच्यासोबत वादी आणि प्रतिवादीचे 36 सदस्य असतील. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल 10 मे रोजी न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्याचवेळी, सर्वेक्षणावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) वकीलही फिर्यादींच्या वतीने वाराणसीला पोहोचले आहेत. मात्र, मुस्लिम पक्षाने व्हिडिओग्राफीवर आक्षेप घेतला आहे. संयुक्त सचिव सय्यद मोहम्मद यासीन यांनी 1993 च्या सुरक्षा योजनेचा हवाला देत सर्वेक्षण थांबवावे, असे सांगितले. त्याचवेळी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Mosque) परिसरात पोहोचलेल्या सर्वेक्षण पथकाविरोधात घोषणाबाजी सुरू झाली आहे. एका बाजूने घोषणाबाजी केल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे वातावरण तापले. मात्र, पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत केले.

 

हे सुद्धा वाचा

 

न्यायलयाची अवहेलना करणाऱ्यांनी आपली भारतीयता सिद्ध करावी

झालेल्या या वादानंतर काशी विश्वनाथ मंदिराचे ट्रस्टी बृज भूषण यांनी म्हटले की, जर एखाद्या आंदोलनासाठी रॅली निघते तेव्हा लोक त्यात सहभागी होतात. हेच कारण आहे की येथे इतका जमाव आहे. या व्यतिरीक्त काही नाही. पण सर्वेच्या विरोधावर बोलताना त्यांनी म्हटले की, न्यायलयाची अवहेलना करणाऱ्यांनी आधी आपली भारतीयता सिद्ध करावी.

नमाज पठणासाठी लोकांची गर्दी

यावर अंजुमन इंतेजामिया मस्जिद समिती चे वकिल अभय एन यादन यांनी यावर बोलताना, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर न्ययालयाने आदेश दिलेले नाहीत. न्यायालयाने इतकेच म्हटले आहे की, दाखल झालेल्या प्रकरणाविषयी एक आयोग नेमायला हवा. तसेच त्या आयोगाने जे पाहिले त्याचा रिपोर्ट न्यायालयाकडे द्यावा.

सर्वेक्षण पथकाविरोधात घोषणाबाजी

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसरात पोहोचलेल्या सर्वेक्षण पथकाविरोधात घोषणाबाजी सुरू झाली आहे. एका बाजूने घोषणाबाजी केल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे वातावरण तापले. मात्र, पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत केले. तर जॉईंट सक्रेटरी सैयद मोहम्मद यासीन यांनी १९९३ च्या सुरक्षा प्लॅनचा मुद्द्यावरून हा सर्वे थांबवावा असे म्हटले. त्यानंतर येथे जोरदारी घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले आहेत.