सरकारचं आयात धोरण, शेतकऱ्यांना पुन्हा फटका; डाळींचे दर घसरले

एकीकडे डाळीचे दर घसरल्याने नागरिकांना फायदा आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसणार आहे.

सरकारचं आयात धोरण, शेतकऱ्यांना पुन्हा फटका; डाळींचे दर घसरले
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 8:40 AM

नागपूर : कोरोनाच्या (Corona) जीवघेण्या संसर्गामुळे शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं. अशात आता केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे. केंद्र सरकारने (Central Government) आयात धोरणात बदल केल्यामुळे डाळींच्या दरात 25 टक्के घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण एकीकडे डाळीचे दर घसरल्याने नागरिकांना फायदा आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसणार आहे. (Pulses prices have fallen by 25 percent due to changes in import policy by the central government)

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व डाळींच्या दरांमध्ये घट झाली आहे. दिवाळीनंतर ही दर घसरल्यामुळे ही आनंदाची बातमी आहे. पण यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार आहे. मुंबई एपीएमसी (Mumbai APMC) धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव पुन्हा घसरू लागले आहेत. खरंतर, देशात डाळ निर्मितीमध्ये जळगावचा वाटा हा मोठा आहे. इथे तयार झालेली डाळ ही देशातील विविध भागांसह विदेशातही निर्यात केली जाते. त्यामुळे या सर्व कडधान्याच्या उत्पादनाचा एकूणच परिणाम हा जळगावच्या बाजारपेठेवर होत असतो.

सध्या महाराष्ट्रासह, राजस्थान, मध्यप्रदेश यांसारख्या भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येत असल्याने डाळींचे उत्पादन वाढत आहे. तसेच, डाळींचे भाव कमी होण्यासदेखील मदत होत आहे. डाळीच्या पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये भाववाढ झाल्याचं दिसून आलं होतं. या भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून 3.6 लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला.

काय आहे आताचे डाळींचे दर?

– तुर डाळींच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची घसरण

– तुर डाळींचे दर कमी होऊन 50 ते 94 रुपये प्रति किलोवर

– चणा डाळीचे दर कमी होऊन 58 ते 64 रुपये किलोवर

दरम्यान, आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळेही डाळींच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांतही डाळीचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सर्वसामान्यांना नागरिकांना चिंता करण्याची काही गरज नाही अशी माहिती डाळीच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. (Pulses prices have fallen by 25 percent due to changes in import policy by the central government)

इतर बातम्या – 

उदय सामंतांची प्राध्यापकांसाठी मोठी घोषणा, तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

Corona Vaccine | पुण्यात रशियाच्या लसीचं दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, या चाचण्या घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

(Pulses prices have fallen by 25 percent due to changes in import policy by the central government)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.