Pulwama Attack : शहीद जवानांसाठी अनुपम खेर यांची कविता

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. स्फोटकं भरलेल्या एका एसयुव्ही कारने भारतीय लष्कराच्या ताफ्यात आत्मघातकी हल्ला करत भीषण असा स्फोट घडवला. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. बॉलिवूडच्याही अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते […]

Pulwama Attack : शहीद जवानांसाठी अनुपम खेर यांची कविता
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. स्फोटकं भरलेल्या एका एसयुव्ही कारने भारतीय लष्कराच्या ताफ्यात आत्मघातकी हल्ला करत भीषण असा स्फोट घडवला. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. बॉलिवूडच्याही अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एक कविता वाचून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

बेबी आणि नाम शबाना सारख्या चित्रपटात काम करणाऱ्या अनुपम खेर यांनी म्हटलं आहे की, मला ही कविता Text Message मधून मिळाली. या कवितेमध्ये जवान आणि सामान्य माणूस यांच्या आयुष्यावर तुलना करणारी आहे. सामान्या माणसाच्या आय़ुष्यात आणि जवानांच्या आयुष्यात किती फरक असतो, हे या कवितेतून दिसत आहे.  या कवितेने मला भावुक केलं आहे आणि या कवितेमुळे मला जाणीव झाली की, भारतीय सैन्य दलाचे बलिदान हे सोपं समजणे म्हणजे खूप सोपं आहे.

या कवितेतून जवान आणि सामान्य माणूस या दोघांची तुलना केली आहे. प्रत्येक दिवस आपल्यासाठी कसा असतो आणि आपल्या जवानांसाठी कसा असतो. याची पूर्णपणे जाणीव करुन देणारी ही कविता आहे. या कवितेचा कवी कोण आहे याची मात्र नाव माहित नसले, तरी अभिनेता अनुपम खेर यांनी ही कविता ट्वीट केली आहे.

व्हिडीओ : शहीद जवानांवरील मन हेलावून टाकणारी कविता