AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pulwama Attack : ‘उरी’ चित्रपटाच्या टीमकडून शहीदांना एक कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. पेमेंट बँक अॅप पेटीएमने घोषणा केली होती की, या अॅपच्या सहाय्याने सीआरपीएफ वेल्फेअर फंडच्या माध्यमातून सीआरपीएफच्या जवानांसाठी तुम्ही दान करु शकता. या व्यतिरीक्त बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले, तर रिलायन्स फाऊंडेशनने शहीदांच्या मुलांचा […]

Pulwama Attack : 'उरी' चित्रपटाच्या टीमकडून शहीदांना एक कोटी रुपयांची मदत
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM
Share

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. पेमेंट बँक अॅप पेटीएमने घोषणा केली होती की, या अॅपच्या सहाय्याने सीआरपीएफ वेल्फेअर फंडच्या माध्यमातून सीआरपीएफच्या जवानांसाठी तुम्ही दान करु शकता. या व्यतिरीक्त बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले, तर रिलायन्स फाऊंडेशनने शहीदांच्या मुलांचा सर्व शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये आता उरी चित्रपटाच्या टीमनेही शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली.

उरी चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी ट्वीट करत माहिती दिली की, उरी चित्रपटाची टीम आर्मी वेल्फेअर फंडला एक कोटींची मदत देत आहे. आम्ही केलेली मदत ही पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मिळावी. आम्ही इतरांनाही विनंती करतो की, त्यांनी सुद्धा अशा कठीण परिस्थितीत जवानांना साथ द्यावी.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी राग व्यक्त केला आहे. तसेच या घटनेचा निषेध करत त्यांनी काळा दिवसही पाळला. या हल्ल्यावर काही कलाकारांनी सरकाराला लवकरात लवकर पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पुलवामा हल्ल्यानंतर उरी चित्रपटातील मुख्य भूमिका साकरणारा अभिनेता विकी कौशलनेही  शहीदांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवादी हल्ल्याची बातमी समजताच मी खुप दु:खी आहे. सीआरपीएफच्या त्या बहाद्दूर जवानांसाठी माझे ह्रदय दाटून आले आहे. जे जवान जखमी आहेत ते लवकरच ठिक होऊ देत, अशी प्रार्थना मी करतो, असं विकी कौशल याने सोशल मीडियावर सांगितले. तर चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनीही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर कठोर कारवाई करत उत्तर दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

व्हिडीओ : शहीद संजय राजपूत यांना अखेरचा सलाम !

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं