पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा

| Updated on: Sep 20, 2020 | 1:52 PM

पुण्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे. (Pune New restricted area list Corona Pandemic)

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा
Follow us on

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यात 2 लाख 57 हजार 409 एकूण कोरोनाबाधित रुग्ण असून यातील 1 लाख 72 हजार 732 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पुण्यात 79 हजार 489 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. पुण्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे. (Pune New restricted area list Corona Pandemic)

पुण्यातील हडपसर, कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, नगर रोड या ठिकाणी कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या शहरांमध्ये एकूण 71 प्रतिबंधित क्षेत्र असतील. या भागात महापालिकेने काही निर्बंध लागू केले आहेत.

पुण्यातील धनकवडी, बालाजीनगर, सिद्धी हॉस्पिटल परिसर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, पवार हॉस्पिटल परिसर, रजनी कॉर्नर या ठिकाणांची नव्या प्रतिबंधित क्षेत्रांची नोंद झाली आहे.

तर कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कोंढवा बुद्रुक, शांती नगर सोसायटी आणि साळवे गार्डन परिसर, कपिल नगर, लक्ष्मी नगर, साई नगर गल्ली नंबर 1 ते 9; सिंहगड रोड परिसरातील वडगाव खुर्द, मॅंगो नेस्ट सोसायटी, सन सिटी रोड, आनंदनगर, धायरी गल्ली नंबर 17; शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील शिवाजीनगर भांबुर्डा, आशा नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखलेनगर, वडगाव शेरी येथील कुमार प्राईम वेरा, घोरपडी येथील पाम ग्रु सोसायटी, घोरपडी लक्ष्मी टेरेस सोसायटी या नव्या भागांची नोंद केली आहे.

दरम्यान यापूर्वीचे कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, पर्वती लक्ष्मी नगर, गुरुवार पेठ, महात्मा फुले, घोरपडी पेठ, वारजे कर्वेनगर ,कोथरूड, बावधन, औंध ,बाणेर हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र कायम आहेत.

दरम्यान पुणे शहरात कोरोनाबाधितांची एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 17 हजार 664 झाली आहे. त्यात 6 हजार 773 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहे. तर होम आयसोलेशनमध्ये 10 हजार 891 रुग्ण उपचार घेत आहेत. (Pune New restricted area list Corona Pandemic)

संबंधित बातम्या : 

पुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु