Pune Corona | पुण्यातील छावणी परिसरात चार दिवस कडक लॉकडाऊन, दूध, मेडिकल व्यतिरिक्त सर्व दुकानं बंद

| Updated on: May 23, 2020 | 5:29 PM

24 मे ते 27 मे पर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या चार दिवसात जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही बंद राहणार आहेत.

Pune Corona | पुण्यातील छावणी परिसरात चार दिवस कडक लॉकडाऊन, दूध, मेडिकल व्यतिरिक्त सर्व दुकानं बंद
Follow us on

पुणे : पुणे शहरात कॅन्टोन्मेंट भाग वगळता (Pune Cantonment Area Lockdown) इतरत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, पुण्यातील क‌ॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत कोरोनाव्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत चार दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन जाहीर (Pune Cantonment Area Lockdown) करण्यात आला आहे.

24 मे ते 27 मे पर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या चार दिवसात जीवनावश्यक वस्तूंचे दुकानही बंद राहणार आहेत. या कालावधीत फक्त दूध आणि औषधांची विक्री सुरु राहील. सकाळी 7 ते रात्री 7 या वेळेत दूध आणि औषधांची दुकानं सुरु राहतील. तर सकाळी सात ते दहा या कालावधीत पोलिस प्रशासनाच्या मदतीने भाजीपाला उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

भीमपुरा आणि नवीन मोदीखाना या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यापूर्वीचा लॉकडाऊन 16 मे ते 22 मे रोजीपर्यंत होता. आज इथे खरेदीसाठी शिथिलता आणली आहे. त्यानंतर उद्यापासून लॉकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी होणार (Pune Cantonment Area Lockdown) आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आतापर्यंत तब्बल 178 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 95 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 81 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, तर दोघांचा मृत्यू 2 झाला आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. सध्या पुण्यात तब्बल 4 हजार 398 बाधित रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 241 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Pune Cantonment Area Lockdown

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुणे विभागात कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या पार, 2 हजार 927 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईहून शिरुरला आलेले आई-वडील होम क्वारंटाईन, लेकीवर अंत्यविधी करण्यास बंधन

कोरोनाबाधित महिलेला पाच दिवसात डिस्चार्ज, पुण्यातील नामांकित खासगी रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार

पुण्यात धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल