VIDEO : पुण्यात एकाच दिवसात 6 सोनसाखळी चोरीच्या घटना

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगचं सत्र सुरू झालंय की काय असा प्रश्न आहे. काल दिवसभरात पुण्यात चेन स्नॅचिंगच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यात जवळपास दहा तोळे सोनं चोरीला गेलं आहे. या प्रकारामुळे महिलांमध्ये भितीचं वातावरण पहायला मिळत आहे. बाईकवरुन सोनसाखळी चोरटे येतात आणि एकट्या महिलेला गाठून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन किंवा सोन्याचे ऐवज […]

VIDEO : पुण्यात एकाच दिवसात 6 सोनसाखळी चोरीच्या घटना
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगचं सत्र सुरू झालंय की काय असा प्रश्न आहे. काल दिवसभरात पुण्यात चेन स्नॅचिंगच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यात जवळपास दहा तोळे सोनं चोरीला गेलं आहे. या प्रकारामुळे महिलांमध्ये भितीचं वातावरण पहायला मिळत आहे.

बाईकवरुन सोनसाखळी चोरटे येतात आणि एकट्या महिलेला गाठून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन किंवा सोन्याचे ऐवज हिसकावून पळून जातात. या घटना पुण्यात आता नित्याच्या झाल्या आहेत. काही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

या भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.