Pune Lockdown | पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई

| Updated on: Jul 18, 2020 | 12:16 AM

पुण्यात गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 8 हजार 97 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात 4 जुलै ते 17 जुलै दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Pune Lockdown | पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई
Follow us on

पुणे : पुण्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे (Pune Citizens Violate Lockdown Rules). कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत काही पुणेकरांना परिस्थितीतीच काहीच गांभीर्य नसल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे (Pune Citizens Violate Lockdown Rules).

पुण्यात गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 8 हजार 97 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात 4 जुलै ते 17 जुलै दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर 4 तारखेपासून कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईसाठी शहरात ठिकठिकाणी दीडशेपेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी सुरु आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या कारवाईत विना मास्क फिरणाऱ्या तब्बल 2,135 मोकाटांवर पोलिसांनी कारवाई केली. तर, मोकाटपणे पायी फिरणाऱ्या आणि वाहनांवर फिरणाऱ्या तब्बल 3 हजार 689 नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईत 1,183 वाहनं जप्त करण्यात आली. तर ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 946 नागरिकांवर कारवाई झाली (Pune Citizens Violate Lockdown Rules).

सम आणि विषम या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 18 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकानं सुरु ठेवणाऱ्या 67 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. दुकानात सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या आठ दुकानांवर कारवाई करण्यात आली. तर वेगवेगळ्या कारणानिमित्त 51 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात 1 हजार 613 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. 13 जुलै ते 17 तारखेच्या पाच वाजेपर्यंत चार दिवसातील ही कारवाई आहे.

कलम 188 अंतर्गत 794 कारवाया करण्यात आल्या आहेत. मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची 397 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. तर 320 नागरिकांना 144 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर 102 मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Pune Citizens Violate Lockdown Rules

संबंधित बातम्या :

Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी हरताळ, 236 वाहनं जप्त

Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा