Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी हरताळ, 236 वाहनं जप्त

लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी तब्बल 593 नागरिकांनी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं.

Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी हरताळ, 236 वाहनं जप्त

पुणे : पुण्यात 23 तारखेपर्यंत दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर (Pune First Day Of Lockdown) करण्यात आला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी काही पुणेकरांनी या लॉकडाऊनला हरताळ फासला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी तब्बल 593 नागरिकांनी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं (Pune First Day Of Lockdown).

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात दिवसा 103 ठिकाणी आणि रात्री 55 ठिकाणी नाकाबंदी सुरु आहे. या नाकाबंदीत कलम 188 अंतर्गत 253 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची 236 वाहनं जप्त करण्यात आली. 144 अंतर्गत 73 नागरिकांना नोटीस बजावली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

लॉकडाऊन काळात मास्क न वापरणाऱ्या 31 महाभागांवर कारवाई केली. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अशा परिस्थितीत नागरिक नियमांचं पालन करत नसल्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, अशाही परिस्थितीत काही पुणेकर मोकाटपणे फिरत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

पुण्यात दिवसभरात 1 हजार 491 रुग्णांची वाढ

पुणे शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. मात्र, मंगळवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात 1,491 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 41 हजार 326 बाधित रुग्ण संख्या झाली आहे. तर, दिवसभरात 43 बाधित रुग्णांचा मृत्यू झालाआहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 1 हजार 141 बाधित रुग्ण दगावले आहेत. तर, दिवसभरात 1166 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत जिल्ह्यात 26, 623 रुग्ण डिस्चार्ज झालेत.

Pune First Day Of Lockdown

संबंधित बातम्या :

Pune Police | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची कडक कारवाई, 24 तासात 1,965 कारवाया

Pune Police | पुणेकरांकडून नियमांची पायमल्ली, पोलिसांकडून 4 दिवसात 2,432 कारवाया

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *