Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शिवाजीनगर परिसरात सिग्नलला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या (Traffic jam in pune amid Lockdown).

Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रणासाठी पुण्यात पुन्हा एकदा 10 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पुण्यात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात सिग्नलला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या (Traffic jam in pune amid Lockdown). एका बाजूला पुण्यातील काही रस्ते ओस पडले आहेत तर शिवाजीनगर परिसरात मोठ्या संख्येने वाहनं रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद आहेत. मात्र, औद्योगिक वसाहती, त्याचबरोबर कमी लोकसंख्येत सरकारी कार्यालय सुरु आहेत. त्यामुळे कामगार नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडले आणि वाहतूक कोंडी झाली. शिवाजीनगर परिसरात चेक पोस्ट असून पोलीस प्रशासन प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहे. अशा स्थितीत अनेक कामगार नेहमीप्रमाणे कामावर बाहेर पडले आणि शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. सिग्नलला वाहतूक कोंडी झाल्याने फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

शिवाजीनगर परिसरात सिग्नलला दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. रस्त्यावर दोन्ही बाजूला अर्ध्या किलोमीटर पेक्षाही जास्त लांबीच्या रांगा लागल्या. लॉकडाऊन काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद आहेत. मात्र अशा परिस्थितीत औद्योगिक वसाहती, मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कार्यालय, बँका सुरु आहेत. त्यामुळं कामगार नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडलेत. गर्दी वाढल्याने शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पुण्यात एकीकडे रस्ते निर्मनुष्य झालेत आणि दुसऱ्या बाजूला नागरीकांचा रस्त्यावर अक्षरशः लोंढा आलाय. अशी विरोधात्मक परिस्थिती असताना कोरोनाची साखळी ब्रेक कशी होईल, असा प्रश्न उपस्थित होतोय.

हेही वाचा :

Pune Lockdown | पुण्यात कडकडीत लॉकडाऊन, आयटी, दूरसंचार कंपन्या, एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार

Pune Lockdown | पुणे-पिंपरीमध्ये लॉकडाऊन; रस्ते-पेठांचे भाग बंद, सात हजार पोलिस तैनात

Traffic jam in pune amid Lockdown

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *