पुण्यात एका दिवसात 12 कोरोनाबळी, मृत्यूदर जैसे थे! पुणेकरांची चिंता कायम

पुण्यात शुक्रवारी एका दिवसात 12 जणांचा कोरोनाबळी गेला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 137 वर पोहोचला (Pune Corona Death Update) आहे.

पुण्यात एका दिवसात 12 कोरोनाबळी, मृत्यूदर जैसे थे! पुणेकरांची चिंता कायम

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Corona Death Update) आहे. पुण्यात शुक्रवारी एका दिवसात 12 जणांचा कोरोनाबळी गेला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 137 वर पोहोचला आहे. पुण्यात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनामुळे इतके मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरलं आहे.

पुण्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊन जवळपास दोन महिने झाले (Pune Corona Death Update) आहेत. मात्र पुण्यातील मृत्यूदर आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील मृत्यूदर हा राज्यापेक्षा आणि देशापेक्षा सर्वाधिक आहे. या मृत्यूदरात सातत्याने वाढ होत असल्याने पुणेकरांची चिंता कायम आहे.

त्यातच काल (8 मे) एका दिवसात पुण्यात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. गेल्या 7 मे रोजी पुण्याचा मृत्यूदर हा 5.8 टक्के इतका होता. हा मृत्यूदर भारतापेक्षा 2.4 जास्त आहे.

सद्यस्थितीत पुण्यात मृत्यूदर 5.8 टक्के इतका आहे. तर त्या खालोखाल महाराष्ट्राचा मृत्यूदर हा 3.9 टक्के आहे. त्यानंतर भारताचा मृत्यूदर 3.4 टक्के इतका आहे.

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. पूर्वीच्या तुलनेत मृत्यूदर काहीसा कमी झाला आहे. मात्र तो नियंत्रणात आणण्यास अद्याप तरी प्रशासनाला बरीच मेहनत करावी लागणार आहे.

तर दुसरीकडे काल दिवसभरात कोरोनाचे नवे 99 रुग्ण सापडले आहेत. तर 61 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, विविध रुग्णालयांतील 76 जणांची स्थिती गंभीर आहे.

भारतात 56 हजार 342 कोरोनाग्रस्त आहेत. त्यातील 1 हजार 886 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात 19 हजार 063 कोरोनाबाधित असून 731 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये 2 हजार 048 रुग्ण असून 136 जणांचा मृत्यू  झाला (Pune Corona Death Update) आहे.

संबंधित बातम्या : 

 राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, रुग्णांचा आकडा 19 हजारांच्या पार

पुण्यात आणखी 99 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 2245 वर

Published On - 8:05 am, Sat, 9 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI