यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा स्तुत्य निर्णय

| Updated on: May 21, 2020 | 3:34 PM

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. (Pune Ganeshotsava to be celebrated in simple manner amid corona pandemic)

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा स्तुत्य निर्णय
Follow us on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला. उत्सव मंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडणे, सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेणे, यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मंडळांच्या बैठकीत एकमत झाले. बाप्पाच्या मिरवणुकीबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. (Pune Ganeshotsava to be celebrated in simple manner amid corona pandemic)

कोविड19 विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजाराचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव यंदा पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सव मंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून, गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करुन सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरुपासंदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरुन पावित्र्य भंग होईल. (Pune Ganeshotsava to be celebrated in simple manner amid corona pandemic)

या संवेदनशील आणि समाजाभिमुख निर्णयाबद्दल सर्व मंडळांचे पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले.