AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण, काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुणे: तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासात आवळल्या. इतकंच नाही तर मुलीचीही सुखरुप सुटका केली. कोंढवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री 7 च्या सुमारास  पुण्यातील कोंढावा परीसरातील  टिळेकरनगर इथून, आरोपीला ताब्यात घेतलं. उमेश सासवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सिमेंट व्यावसायिकाची तीन वर्षांची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी उमेश सासवेने […]

पुण्यात तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण, काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

पुणे: तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासात आवळल्या. इतकंच नाही तर मुलीचीही सुखरुप सुटका केली. कोंढवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री 7 च्या सुमारास  पुण्यातील कोंढावा परीसरातील  टिळेकरनगर इथून, आरोपीला ताब्यात घेतलं. उमेश सासवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

सिमेंट व्यावसायिकाची तीन वर्षांची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी उमेश सासवेने तिचे अपहरण केलं होतं.  त्यानंतर आरोपीने स्वत: राहात असलेल्या टिळेकरनगर इथल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर डांबून ठेवलं होतं.

कोंढवा पोलीस आणि पुणे शहर गुन्हे युनीट 5 च्या पथकाने काही तासात, या गुन्ह्याचा छडा लावून, चिमुकलीची सुटका केली.

आरोपी उमेश हा दारु प्यायला होता. त्याच नशेत त्याने मुलीचं अपहरण केलं. अपहरण करुन रस्त्यावरुन जात असताना, नागरिकांनी त्याला हटकलं. मात्र त्यावेळी त्याने ही मुलगी आपलीच असल्याचं सांगितलं. मात्र पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळून, चिमुकलीची सुखरुप सुटका केली.

Follow Us
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे