AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lockdown: पुण्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून (19 जुलै) काही प्रमाणात शिथिल होत आहेत (Pune lockdown restriction changes).

Pune Lockdown: पुण्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 19, 2020 | 9:51 AM
Share

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून (19 जुलै) काही प्रमाणात शिथिल होत आहेत (Pune lockdown restriction changes). याप्रमाणे नागरिकांना आजपासून जीवनाश्यक वस्तू खरेदीला अधिक सूट मिळणार आहे. दुकानं सुरु करण्याच्या वेळेतही बदल करत आज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. मात्र सोमवारपासून दुकानांसाठी सकाळी 8 ते 12 पर्यंतचीच वेळ असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हस्तक्षेप करत पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पुण्यात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन 23 जुलैपर्यंत लागू असणार आहे. या दरम्यान, दारु दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यातील उपाययोजनांचीही माहिती दिली. 13 जुलै रोजी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनचा शनिवारी (18 जुलै) पहिला टप्पा संपला. 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन आहे. आज 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सकाळपासून जीवनावश्यक दुकानांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे आज गटारी असल्यामुळे मटण, चिकन दुकानांच्या बाहेरही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होत असल्याने आज मटण चिकन विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मागील 5 दिवसांपासून शहरातील मटण-चिकनची दुकानं बंद होती. शहरातील सर्व मटण-चिकन दुकानांबाहेर रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करुन मटण चिकनची विक्री केली जात असल्याचं मत संबंधित दुकानदारांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :

Corona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

Corona Vaccine | कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी हॅकिंग, रिसर्च लॅब अलर्टवर

Mumbai Corona | आधी धारावी आता संपूर्ण मुंबईत कोरोना नियंत्रणात, पालिकेच्या 15 टिप्स!

Pune lockdown restriction changes

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?