AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Corona | आधी धारावी आता संपूर्ण मुंबईत कोरोना नियंत्रणात, पालिकेच्या 15 टिप्स!

महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मुंबई शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं (Mumbai BMC solution for Corona Cases Control) होतं.

Mumbai Corona | आधी धारावी आता संपूर्ण मुंबईत कोरोना नियंत्रणात, पालिकेच्या 15 टिप्स!
मुंबई महापालिका
| Updated on: Jul 18, 2020 | 9:34 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मुंबई शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं (Mumbai BMC solution for Corona Cases Control) होतं. दर दिवस मुंबईत कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ पाहायला मिळत होती. मात्र मुंबई महापालिकेच्या अथक परिश्रमातून कोरोना नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या 15 टिप्स

1. मुंबईत कोरोना विळखा वाढू शकतो हे कळताच सुरुवातीला मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केलं.

2. मुंबईत झोपडपट्टया अधिक असल्याने कोरोना वेगाने फैलू शकतो म्हणून पालिकेने प्रभावी उपाययोजना केल्या.

3. कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

4. मुंबई महापालिकेने सुरुवातीला एक प्रोग्राम हाती घेतला.

a) कोरोनाच्या चाचण्या करणे b) रुग्णांचा शोध घेणे c) रुग्णांचा शोध घेऊन त्यांचं अलगीकरण d) कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न e) सोशल डिस्टन्सिंग पाळणे

या महत्त्वाच्या सूत्रांचा वापर करुन एक मॉडेल तयार केलं. ज्यामुळे कोरोनाची संख्या दाट लोकवस्ती असूनही कमी करण्यास मदत झाली. धारावीच्या या पॅटर्नचं WHO ने कौतुक केलं आहे.

5. स्थानिक नागरिक, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्न करण्यात आले.

6. कोरोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करून रुग्णांवर योग्य उपचार करणे, शारीरिक अंतराच्या नियमाचे, स्वच्छतेचे आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते.

7. कोरोना सापडलेल्या ठिकाणी कंन्टेंमेट झोन आणि इमारती सील केल्या. या भागातील लोकांना घरपोच अत्यावश्यक सेवा पुरवल्या. यामुळे कोरोना साखळी तोडण्यास मदत झाली.

8. मुंबई महापालिका रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्यात आली. तसेच बेडची माहिती त्वरित मिळावी म्हणून रुग्णालयात डॅश बोर्ड तयार करण्यात (Mumbai BMC solution for Corona Cases Control) आला.

9. मुंबईत कोरोना रोखण्यास मदत झाली. अनेक भागात घेतलेले फिवर क्लिनिक, फिरते मोबाईल व्हॅन, दवाखाने यांचीसोय केली.

10. खासगी रुग्णालयातील 80 टक्के मुंबई पालिकेने ताब्यात घेतले. ते कोरोना रुग्णांना कमी किमतीत देण्यात आले.

11. मुंबईत रुग्ण वाहिकांची संख्या वाढवण्यात आली. मग त्याची सुद्धा माहिती सर्वांना लवकर मिळावी त्यासाठी हेल्पलाईन नंबर तयार करण्यात आला.

12. मुंबईत कोरोना रुग्णांना लवकर बेडस उपलब्ध व्हावेत, यासाठी 24 वॉर्डमध्ये हेल्पलाईन सेंटर तयार करण्यात आले.

13. सरकारी डॉक्टर आणि खासगी डॉक्टर यांची मदत घेण्यात आली.

14. मुंबई सेरो सर्व्हे , अँटीजन टेस्ट, एक्सरे व्हॅन सुरु करण्यात आले.

15. मुंबईत कोरोना रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर यांची टीम दिवसरात्र काम करत (Mumbai BMC solution for Corona Cases Control) होती.

संबंधित बातम्या : 

कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान

राजभवनातील 100 पैकी 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 60 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.