अजित पवारांच्या नेतृत्वात पुण्यात काम होत नाही का? महापौरांचा विरोधकांना सवाल

विरोधकांनी अपयशी कारभाराचे आरोप केल्यानंतर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या आरोपांचा चांगलाच समाचार घेतलाय (Pune Mayor Murlidhar Mohol on Ajit Pawar).

अजित पवारांच्या नेतृत्वात पुण्यात काम होत नाही का? महापौरांचा विरोधकांना सवाल

पुणे : पुण्यात कोरोना व्हायरसनं कहर केलाय. मात्र, अशी परिस्थिती असतानाच पुणे मनपातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. विरोधकांनी अपयशी कारभाराचे आरोप केल्यानंतर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या आरोपांचा चांगलाच समाचार घेतलाय (Pune Mayor Murlidhar Mohol on Ajit Pawar). पालकमंत्री अजित पवार हे पुण्यात आठवड्याला आढावा बैठक घेतात. मग अजित पवार यांच्या नेतृत्वात काम होत नाही असं म्हणायचं आहे का असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना केला आहे.

पुणे महानगरपालिकेत भाजप सत्तेवर आहे. अशातच विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने पालिकेच्या कारभारावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. विरोधकांनी आरोप केल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील विरोधकांना घेरलं आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले, “कंटेनमेंट भागाच्या व्यतिरिक्त नियम शिथिल केल्यानं गोंधळाचं वातावरण आहे. पालिकेत जे विरोधक आहेत त्यांचंच राज्यात सरकार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांचेच आहेत. मात्र पुणेकरांच्या त्रासावर ते बोलत नाहीत किंवा विनंतीही करत नाहीत. मात्र राजकारणसाठी पुढं येत आहेत. पालकमंत्री अजित पवार हे आठवड्याला आढावा बैठक घेतात. मग अजित पवार यांच्या नेतृत्वात काम होत नाही असं विरोधकांना म्हणायचे आहे का? हे अपयश पालकमंत्र्यांचं आहे.”

“विरोधक मागील 40 दिवस कुठे होते हे मी विरोधकांना विचारणार नाही. मात्र, प्रवाहात आला तर आता लक्ष घाला. आपत्तीच्या काळात सरकारच पालिका कारभार चालवत आहे. सरकारच्या आदेशानं पालिकेचं काम सुरु आहे, असंही मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केलं. यावेळी महापौरांनी विरोधकांच्या विसंगतीवरही बोट ठेवलं. महापालिकेतील विरोधी पक्षनेते आयुक्तांच्या कारभारावर टीका करतात, तर शहराध्यक्ष त्यांची स्तुती करतात. सर्वांनी सामान्यांच्या भल्यासाठी, हितासाठी एकत्र काम करु”, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Upadte | राज्यात दिवसभरात कोरोनाचे 1,233 नवे रुग्ण, आकडा 17 हजारच्या उंबरठ्यावर

एका दिवशी हार्डवेअर, दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम, तिसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक, पुण्यात कोणत्या दिवशी कोणतं दुकान उघडणार?

लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ, पुण्यात बस चालकाची आत्महत्या

Pune Mayor Murlidhar Mohol on Ajit Pawar

Published On - 12:09 am, Thu, 7 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI