आजाराचा बनाव, पुणे मनपा कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करणार, अतिरिक्त आयु्क्तांचा इशारा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आजाराचा बनाव करुन रजेवर गेलेल्या पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Pune municipal employee retirement) सेवा मुक्तीचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे.

आजाराचा बनाव, पुणे मनपा कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करणार, अतिरिक्त आयु्क्तांचा इशारा
| Edited By: | Updated on: Apr 16, 2020 | 8:19 AM

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आजाराचा बनाव करुन रजेवर गेलेल्या पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Pune municipal employee retirement) सेवा मुक्तीचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली (Pune municipal employee retirement) आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पुणे महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्याच्या तक्रारी करुन वैद्यकीय रजेवर गेले आहेत. मात्र अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची खातरजमा करण्यात येणार आहे.

जे अधिकारी-कर्माचारी रजेवर रुजू झाल्यास त्यांच्याकडून वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. माञ कोणी अपात्र ठरल्यास अशा कर्मचाऱ्याला सेवामुक्त करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.

काही मनपा अधिकारी आणि कर्मचारी आरोग्याची कारणं सांगून रजा घेत आहेत. तर काहीजण रजेवर गेल्याचं प्रशासनाला आढळून आलं आहे. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली.

पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यासाठी पुणे आयुक्तांकडून कोरोनावर रोख लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 351 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यामधील अनेक विभाग सील करण्यात आले आहेत. तर या सर्व कोरोना रुग्णांवर पुण्यातील नायडू, भारती विद्यापीठासह इतर तीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यात आतापर्यंत 34 लोकांचा मृत्यू झालेला आहे.

दरम्यान, राज्यासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात आतापर्यंत 2916 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 187 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात 10 हजार पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.