पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

| Updated on: Mar 17, 2020 | 10:13 AM

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद (Pune trade market and shops close) राहणार आहे.

पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार
Follow us on

पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद (Pune trade market and shops close) राहणार आहे. पुण्यातील व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतला आहे. किराणा, दूध, भाजीपाला वगळून, घाऊक आणि रिटेल व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात येतील. महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी ही  माहिती, दिली. (Pune trade market and shops close)

किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकलची दुकानं सुरु राहणार आहेत.जीवनश्यक वस्तू वगळण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी शक्य ती सर्व खबरदारी वैयक्तिक पातळीवर नागरिकांनी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पुण्यातील दुकानांबाबत गुरुवारी पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवर मुख्य बाजारपेठ आहे, या रस्त्यावर नेहमी मोठी गर्दी असते. मात्र आता ही गर्दी ओसरताना दिसत आहे.

Corona | पुण्यात संचारबंदीचा प्रस्ताव, तुळशीबाग तीन दिवस बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग कालपासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यापारी असोसिएशने हा निर्णय घेतला आहे. पुण्यातील तुळशीबाग हे विविध प्रकारच्या वस्तूंच्या (Cerfew Praposal In Pune) खरेदीसाठी महिलांचे आवडीचे ठिकाण आहे. तुळशीबागेतील ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन, हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी व्यापारी असोसिएशनला केलेल्या आवाहनाला असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे.

पुण्यात सार्वजनिक ठिकाणं बंद

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरातील बाजारपेठा, मंदिर, सार्वजनिक उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र नियमितपणे मार्केट यार्ड सुरु आहे. भाजीपाला मार्केट यार्डात 1750 गाड्यांची आवक झाली आहे. पुणे मार्केट बंद करण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. पुणे मार्केट यार्डला दररोज वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांची गर्दी असते.

बनवाट सॅनिटायजर्सवर छापा

कोरोना रोखण्यासाठी अनेक जण खबरदारी म्हणून सॅनिटायजर्स वापरत आहेत. मात्र अनेक जिल्ह्यात त्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे बनावट सॅनिटायजरचा बाजारात सुळसुळाट पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांनी बनावट सॅनिटायजर बॉटल विकणाऱ्या मेडीकलवर  मध्यरात्री छापा टाकला. मार्केटयार्ड – कोंढवा बायपास रोडवरी गंगाधाम चौकातील मेडीकल दुकानावर छापा मारुन, पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने छापा मारत बनावट सॅनिटायझरच्या बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

राज्यातील बाधितांचा आकडा 

राज्यात कोरोनाबाधितांच्या (Corona Patients Increased) संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. नवी मुंबईत आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती 16 मार्चला समोर आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची संख्या 39 वर गेली आहे.

संबंधित बातम्या 

Corona | पुण्यात संचारबंदीचा प्रस्ताव, तुळशीबाग तीन दिवस बंद  

कोरोना संसर्गाने तमाशाही अडचणीत, सुपाऱ्या रद्द झाल्यानं कोट्यावधींचा फटका  

कोरोना म्हणजे पाप नाही, बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार : पुणे विभागीय आयुक्त