पहाटे फटाके फोडल्याने जेलवारी, अडीच लाखाचा दंड

सिंगापूर: दिवाळी आल्यानंतर ठिकठिकाणी आतषबाजी केली जाते. पण सिंगापूरमध्ये पाच महिन्यांपूर्वी दिवाळीनिमित्ताने फटाके फोडल्याने एका व्यक्तीला चक्क जेलवारी करावी लागली आहे. त्याशिवाय त्याला 2 लाख 56 हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आणि मूळचे भारतीय असलेल्या जीवन अर्जुन (29) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मूळ भारतीय असलेल्या जीवन अर्जुन यांनी सिंगापूरमधील लिटिल […]

पहाटे फटाके फोडल्याने जेलवारी, अडीच लाखाचा दंड
Namrata Patil

|

Jul 05, 2019 | 4:02 PM

सिंगापूर: दिवाळी आल्यानंतर ठिकठिकाणी आतषबाजी केली जाते. पण सिंगापूरमध्ये पाच महिन्यांपूर्वी दिवाळीनिमित्ताने फटाके फोडल्याने एका व्यक्तीला चक्क जेलवारी करावी लागली आहे. त्याशिवाय त्याला 2 लाख 56 हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आणि मूळचे भारतीय असलेल्या जीवन अर्जुन (29) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मूळ भारतीय असलेल्या जीवन अर्जुन यांनी सिंगापूरमधील लिटिल इंडिया या दुकानातून 6 नोव्हेंबर 2018 रोजी दिवाळीनिमित्त फटाके खरेदी केले. फटाके खरेदी केल्यानंतर दिवाळीच्या पहाटे 3.30 च्या सुमारास घराजवळ फोडले. जीवन निवासी परिसरात राहतो. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे 5 ते 10 मिनीटांपेक्षा जास्त फटाक्यांचा आवाज येत होता. पण त्यांनी केलेल्या या आतषबाजीत कोणतीही जीवतहानी किंवा कोणाचेही नुकसान झाले नाही.

मात्र पहाटे 3.30 वाजता अनेकजण झोपेत होते. जीवनने फोडलेल्या फटाक्यांमुळे अनेकांची झोपमोड झाली. त्याशिवाय अनेक वयोवृद्ध व्यक्तींना फटाक्यांचा आवाज आणि धुरामुळे त्रास झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गेल्या वर्षभरापासून यावर कोर्टात सुनावणी सुरु होती. अखेर गुरुवारी सिंगापूरच्या न्यायलयाने जीवनला फटाके स्वत: जवळ बाळगणे आणि त्यांची आतषबाजी करणे या गुन्ह्याविरोधात तीन आठवडे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच जीवनला 5000 सिंगापूर डॉलर म्हणजे 2 लाख 55 हजार 599 रुपये दंड भरावा लागणार आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें