‘देशाचा वेळ वाया घालवू नका’, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे (Rahul Gandhi slams PM Modi).

'देशाचा वेळ वाया घालवू नका', राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

नवी दिल्ली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटमार्फत थट्टा मस्करी करुन देशाचा वेळ वाया घालवणं बंद करावं”, असा घणाघात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर केला आहे (Rahul Gandhi slams PM Modi). या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयालाही टॅग केलं आहे.

“आपल्या सोशल मीडिया अकाउंटबाबत गैरसमज पसरवून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा. भारत सध्या आणीबाणीच्या परिस्थितीशी झुंजतोय. सध्या कोरोना व्हायरस देशासाठी एक आव्हान बनलं आहे. सरकारने कोरोनाचा सामना कसा करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवं”, असा सल्ला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे (Rahul Gandhi slams PM Modi).

राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली. “आयुष्यात काही क्षण असे येतात की ज्यावेळी देशाची जनता आपल्या खऱ्याखुऱ्या नेत्याला ओळखते. एक खऱ्या नेत्याचं संपूर्ण लक्ष हे सामूहिक संकटाला दूर करण्याकडे असतं. कोरोना व्हायरसचा परिणाम हा भारत आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडू शकतो”, असं राहुल गांधी म्हणाले.

याअगोदरही राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केलं होतं. “देशातील जनतेला कोरोना व्हायरसपासून मोठा धोका आहे. हा व्हायरस भारतीय अर्थव्यवस्थेसाठीदेखील धोकादायक आहे. मला असं वाटतं की कोरोना व्हायरला सरकारने गांभिर्याने घेतलेलं नाही. कोरोनावर योग्यवेळी उपाययोजान केली नाही तर ते देशासाठी धोकादायक ठरु शकतं”, असंदेखील राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “काळजी करण्याची आवश्यकता नाही, घाबरु नका. आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून कोरोनाचा सामना करायचं आहे”, असं मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री (सोमवार 2 मार्च) 9 वाजताच्या सुमारास ‘फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाऊण्ट्स ‘गिव्ह अप’ करण्याचा विचार’ बोलून दाखवत खळबळ उडवून दिली होती. अनेकांनी या ट्विटचा अर्थ मोदी सोशल मीडियावरुन संन्यास घेणार असा पकडला होता. मात्र, यावर मोदींनी स्पष्टीकरण देत सोशल मीडिया सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘गिव्हिंग अप माय सोशल मीडिया अकाऊण्ट्स’ असं लिहित नरेंद्र मोदींनी शब्दांचे खेळ केल्याचं स्पष्ट झालं आहे. महिला दिनाचं औचित्य साधून रविवारी नरेंद्र मोदी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी महिलांना आपलं सोशल मीडिया अकाऊण्ट वापरण्यास देणार आहेत.

संबंधित बातम्या :

सोशल मीडिया सोडणार नाही, नरेंद्र मोदींनीच सांगितला ‘त्या’ ट्वीटचा खरा अर्थ

पंतप्रधान मोदींच्या पावलांवर पाऊल, अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार?

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, रविवारपर्यंत सोशल मीडियातून संन्यास घेण्याचा विचार?

Published On - 5:32 pm, Tue, 3 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI