‘कोकणी माणसाचा महिना फुकट जातोय’, काँग्रेस नेत्याची क्वारंटाईन हटवण्याची मागणी

| Updated on: Aug 02, 2020 | 6:34 PM

कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी रायगड काँग्रेसच्या नेत्याने केली आहे. ( Raigad Congress leader oppose quarantine).

कोकणी माणसाचा महिना फुकट जातोय, काँग्रेस नेत्याची क्वारंटाईन हटवण्याची मागणी
Follow us on

मुंबई : कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार आणि रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केली आहे (Raigad Congress leader oppose quarantine). 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. हा उत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी खास चाकरमाने सुट्टी काढून कोकणात येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवाला रायगड जिल्ह्यात येणाऱ्यांना 7 ऑगस्टपूर्वी दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे क्वारंटाईनमध्ये कोकणी लोकांचे 22 दिवस वाया जातील असं मत माणिक जगताप यांनी व्यक्त केलं आहे.

माणिक जगताप म्हणाले, “नुकताच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश उत्सवात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणी जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या गणेश भक्तांना क्वारंटाईनचा निर्णय घेतला आहे. त्यांना 5 ऑगस्टच्या आधी आपआपल्या गावी पोहचायला सांगण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हे क्वारंटाईन देखील स्वतःच्या घरात नाही, तर गावाच्या बाहेर क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांना गणेशोत्सव झाल्यावर पुन्हा मुंबईत परतल्यानंतर 7 दिवस क्वारंटाईन राहायचं आहे. म्हणजे आमच्या कोकणी माणसाचा जवळजवळ 1 महिना वाया जाणार आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“मुळात या सर्व गोष्टींमध्ये लोक भरडले गेले आहेत. अशा प्रकारचे निर्णय घेताना जिल्हाधिकारी घेतील असं नाही. मागच्यावेळी आपल्या सर्वांवर लॉकडाऊन लादण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना तो लॉकडाऊन करायचा नव्हता, पण सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले आणि पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. आज त्याचा इतका फज्जा उडाला की रुग्णांची संख्या वाढली. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवस आधीच लॉकडाऊन गुंडाळावा लागला. आजही हीच स्थिती आहे,” असं माणिक जगताप म्हणाले.

“गणपतीरायाला साकडं घालण्यासाठीही 14 दिवस क्वारंटाईन करणार का?”

माणिक जगताप म्हणाले, “गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्राचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणाच्यावेळी माझा कोकणी माणूस हक्काने दोन तीन दिवस आधी येतो. आनंदाने तो सण साजरा करतो आणि जातो. एकतर यावर्षी महाराष्ट्रावर, देशावर आणि जगावर फार मोठं संकट आहे. त्यामुळे आता गणपतीरायाला साकडं घालण्यासाठी देखील आम्हाला 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

या सर्व गोष्टींना माझा तीव्र आक्षेप आहे, त्या सरकारने मागे घ्याव्यात. मागील 5-6 महिने पाहिलं. आपल्याला कोरोनासोबत आपलं दैनंदिन आयुष्य सुरु ठेवावं लागणार आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय त्यांनी घेतला असं वाटत नाही.मागचा निर्णय लादला तसाच हाही निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला. तो ताबडतोब मागे घ्यावा आणि कोकणी माणसावरील संकट दूर करावं, अशी मागणी माणिक जगताप यांनी केली.

हेही वाचा :

मॉलला परवानगी, जिमला का नाही? सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा ठाकरे सरकारला सवाल

Pune Micro Containment Zones | पुणे शहरात 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर

पुणे पालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Raigad Congress leader oppose quarantine