उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित, रायगड पुन्हा रेड झोनमध्ये

| Updated on: May 10, 2020 | 3:04 PM

रायगडमधील उरण तालुक्यात एकाच वेळी 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले (Raigad District Corona Patient) आहेत.

उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित, रायगड पुन्हा रेड झोनमध्ये
Follow us on

रायगड : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारच्या पार गेला (Raigad District Corona Patient) आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. रायगडमधील उरण तालुक्यात एकाच वेळी 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

रायगड जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रायगडमधील (Raigad District Corona Patient) उरण तालुक्यात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण करंजा गावातील एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्या सर्वांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे तो कोरोनाबाधितही त्याच कुटुंबातील आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 234 वर पोहोचली आहे.

यातील 15 जणांना नवी मुंबईतील एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र अशा पद्धतीने एकाच दिवशी इतके रुग्ण आढळल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच रायगड जिल्ह्याची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे बोलल जात आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 20 हजार 228 वर पोहोचली आहे. काल (9 मे) दिवसभरात 1 हजार 165 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात 330 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 3,800 रुग्ण कोरोनातून बरे झाले (Raigad District Corona Patient) आहेत.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार, दिवसभरात 1,165 नवे रुग्ण

संगमनेरमध्ये एकाच दिवसात 7 कोरोना रुग्ण, नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 51 वर