AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संगमनेरमध्ये एकाच दिवसात 7 कोरोना रुग्ण, नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 51 वर

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शुक्रवारी (8 मे) एकाच दिवसात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Sangamner corona patient updates Ahmednagar).

संगमनेरमध्ये एकाच दिवसात 7 कोरोना रुग्ण, नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 51 वर
| Updated on: May 09, 2020 | 10:06 PM
Share

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शुक्रवारी (8 मे) एकाच दिवसात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Sangamner corona patient updates Ahmednagar). त्यामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या अहमदनगरची वाटचाल पुन्हा कोरोना हॉटस्पॉटकडे होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. या नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील जवळपास 70 हजार नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नव्याने नोंद 7 कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 51 वर पोहोचली आहे.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे एका 68 वर्षीय व्यक्ती आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णाच्या अहवालावरुन संशय आल्याने त्यांनी त्याचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवले. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित चाचणीचे अहवाल येण्याआधीच रुग्णाला घरी नेले. मात्र, घरी गेल्यानंतर या रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर तातडीने या रुग्णाचा कोरोना अहवाल मागवण्यात आला असता तो रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्हा यंत्रणेने सतर्क होत कठोर पावले उचलली आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. या गावातील एकूण 6 जण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधिक्षक अखिलेश सिंग यांनी धांदरफळ गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मृत रुग्ण उपचारासाठी ज्या खासगी रुग्णालयात दाखल होता तेथेही भेट देत माहिती घेतली.

धांदरफळमध्ये 6 कोरोना रुग्ण, 5 वर्षीय मुलाचाही समावेश

संगमनेरमधील एकूण 7 कोरोना बाधित रुग्णांपैकी 6 जण धांदरफळ बुद्रुक येथील तर एक महिला संगमनेर शहरातील आहे. धांदरफळ बुद्रुकमधील कोरोना बाधित रुग्णांच्या आज आलेल्या अहवालानुसार यामध्ये एका 28 वर्षीय महिलेसह 5 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 51 झाली आहे. धांदरफळमध्ये आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 2 व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईक आहेत. मृत्यू झालेला कोरोना रुग्ण हा अंडी विक्रेता असल्याने त्याचा संपर्क त्याच्यागावासह आजूबाजूच्या गावातील अनेक लोकांसोबत आल्याचं समोर आलं आहे.

संगमनेर शहरासह धांदरफळ गाव 22 मेपर्यंत कोरोना हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित

4 दिवसांपूर्वी सदर रुग्णाला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. रुग्णातील लक्षणे पाहता तेथील डॉक्टरांनी या रुग्णाचे स्वॅब नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले. मात्र, या चाचणीचे अहवाल येण्याआधीच रुग्णाच्या नातेवाईकांनी आडमुठेपणा करत रुग्णाला घरी नेले. यानंतर शुक्रवारी (8 मे) सकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याच्यावर उपचार करणाऱ्या एका खासगी डॉक्टरसह एका सरकारी डॉक्टरला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संगमनेरला भेट दिल्यानंतर संगमनेर शहरातील काही भाग आणि धांदरफळ गावाला 22 मेपर्यंत कोरोना हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. धांदरफळ गावातील नागरिकांना आता घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावातील 1600 जणांची आरोग्य तपासणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील इस्‍लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्‍ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, कुरण आणि धांदरफळ बुद्रुक या भागाला कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले. या क्षेत्राच्‍या मध्‍यबिंदुपासून जवळपास 2 किलोमीटरचा परिसर हा कोअर एरिया म्‍हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्‍थापनं, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री इत्‍यादी 9 मे रोजी सकाळी 06 वाजल्यापासून 22 मे 2020 रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार, दिवसभरात 1,165 नवे रुग्ण

कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांची संख्या 305 वर, नव्या 25 रुग्णांपैकी 12 जण अत्यावश्यक सेवेतील

Pune Corona | मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त शेखर गायकवाड

Sangamner corona patient updates Ahmednagar

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.