कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांची संख्या 305 वर, नव्या 25 रुग्णांपैकी 12 जण अत्यावश्यक सेवेतील

कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांची संख्या 305 वर, नव्या 25 रुग्णांपैकी 12 जण अत्यावश्यक सेवेतील

आज कल्याण-डोंबिवलीत आणखी 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 305 वर पोहोचली आहे.

Nupur Chilkulwar

|

May 09, 2020 | 7:17 PM

कल्याण : कल्याण- डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक(Kalyan-Dombivali Corona Update) वाढत चालला आहे. आज (9 मे) कल्याण-डोंबिवलीत आणखी 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 305 वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे या 25 नव्या रुग्णांपैकी 12 रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तर आज डोंबिवलीतील 67 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे केडीएमसीतील एकूण मृतांची संख्या आता 4 वर (Kalyan-Dombivali Corona Update) पोहोचली आहे.

कल्याण-डोंबिवली कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

कल्याण-डोंबिवली हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. सध्या केडीएमसीतील 305 रुग्णांपैकी तब्बल 121 रुग्ण हे शासकीय सेवेतील, अत्यावश्यक सेवेतील आणि खाजगी कर्मचारी आहेत. यांच्या संपर्कात आल्याने केडीएमसीत अनेकांना कोरोना झाला असल्याची माहिती आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला डोंबिवलीत झालेल्या हळदी आणि लग्न सभारंभ येथील नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला होता. या सभारंभात अनेक जण सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे रुग्णांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काही झालं नाही (Kalyan-Dombivali Corona Update).

केडीएमसीतील 305 पैकी 121 कोरोना रुग्ण हे इतर भागात काम करणारे सरकरी आणि खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 41 जणांनांही कोरोनाची लागण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील 50 टक्के रुग्ण हे कल्याण-डोंबिवली बाहेर ये-जा करणारे आहेत. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 10 हॉटस्पॉट आहेत. जवळपास 2o कंटेन्मेंट झोन आहेत. संपूर्ण कल्याण-डोंबिवली रेडझोन म्हणून घोषित करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजारांच्या पार 

राज्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही राज्यातील कोरोनाचं संकट अद्याप नियंत्रणात आलेलं नाही. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 19 हजार 063 वर पोहोचली आहे. 8 मे रोजी दिवसभरात 1 हजार 089 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Kalyan-Dombivali Corona Update

संबंधित बातम्या :

परप्रांतियांचे परतण्यासाठी लोंढे, कसारा घाट हाऊसफुल्ल, वाहनांच्या लांबच लांब रांगा

जळगावात कोरोनाचा कहर, 157 पैकी 100 रुग्ण एकट्या अमळनेरमध्ये

काल 87, आज 96 पोलिसांना कोरोना, आतापर्यंत 714 पोलीस कोरोनाबाधित

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शवागृह, मुंबई महापालिकेचा निर्णय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें