रायगड MIDC मध्ये स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू, 16 जखमी, अनेकांचे डोळे गेले

| Updated on: Nov 16, 2019 | 11:40 AM

रायगडमध्ये एका कंपनीत बॉयलर सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 16 कामगार जखमी आहेत

रायगड MIDC मध्ये स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू, 16 जखमी, अनेकांचे डोळे गेले
Follow us on

रायगड : रायगडमध्ये एका कंपनीत बॉयलर सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 16 कामगार जखमी आहेत (CRYPTZO engineering company). माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास हा सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये 18 कामगार जखमी झाले होते (cylinder blast).

18 जखमी कामगारांपैकी आशिष येरुनकर आणि राकेश हळदे या दोन कामगारांचा नवी मुंबईतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पाच कामगार हे गंभीर जखमी आहेत. जखमींना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या स्फोटामुळे काही जखमी कामगारांचे डोळे गेल्याची माहिती आहे.

विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की यामुळे तब्बल 18 कामगार जखमी झाले. हा स्फोट का झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याचा आरोप होत आहे.

या घटनेनंतर माणगाव पोलीस निरीक्षक रामदास इंगावले, सहपोलीस निरीक्षक प्रियांका बुरुंगले, पोलीस स्वप्निल कदम आणि इतर पोलीस कर्मचारी तपास करत आहेत.