अलिबागमध्ये हायप्रोफाईल रॅकेट, मुली पुरवणारे एजंट ताब्यात, 7 तरुणींची सुटका

| Updated on: Jun 28, 2019 | 9:30 PM

अलिबागमधील किहीम येथील बंगल्यावर धाड टाकत मुली पुरवणाऱ्या दलालांसह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये अनेक टीव्ही कलाकारांचा समावेश आहे.

अलिबागमध्ये हायप्रोफाईल रॅकेट, मुली पुरवणारे एजंट ताब्यात, 7 तरुणींची सुटका
Follow us on

रायगड : समुद्रकिनारी फिरण्याच्या नावावर अवैध कामं करण्यासाठी गेलेल्या 11 जणांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अलिबागमधील किहीम येथील बंगल्यावर धाड टाकत मुली पुरवणाऱ्या दलालांसह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये अनेक टीव्ही कलाकारांचा समावेश आहे. पोलिसांनी नाव सांगण्यास नकार दिली असला तरी अनेक प्रसिद्ध नावं यामध्ये आहेत.

एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसह 10 मुली, 4 ब्रोकर आणि 4 वाहनचालकांना अटक करण्यात आली आहे. अलिबाग शहराशेजारी असलेल्या बंगल्यांमध्ये नेहमीच मुंबईत राहणाऱ्या पर्यटकांची वर्दळ असते. पण बर्थ डे पार्टीच्या नावाखाली मुलींनी आणून वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

पोलिसांनी अलिबाग शहर आणि लगतच्या भागात पडताळणी केली असता त्यांनी ब्रोकरचे दोन नंबर मिळाले. पोलिसांनी ग्राहक बनून या नंबरवर फोन केला आणि चर्चा केली. समोरच्या ब्रोकरने अगोदर खात्यावर पैसे टाकायला सांगितलं. त्यानंतर मुलींची नावं सांगून त्यांचा रेट कळवला आणि दोन बंगले बूक केले.

ठरल्याप्रमाणे दोन पंच आणि बनावट ग्राहकांसमोरच प्रीट्रॅप पंचनामा करण्यात आला. बनावट ग्राहक बंगल्यात गेल्यानंतर तिथे दलाल आणि त्यांच्यासोबत मुली अगोदरच बसल्या होत्या. यानंतर बनावट ग्राहकाने एजंटकडे रक्कम दिली आणि मुलगी ताब्यात देण्यात आली. मुलीला रुममध्ये नेल्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना मिस कॉल दिला आणि पोलिसांनी बंगल्यात धाड टाकली.

बंगल्यात धाड टाकताच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता तरुणींकडे कोकेनही आढळून आलं, शिवाय यापैकी काही तरुणींनी अंमली पदार्थांचं सेवनही केलं होतं. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सर्वांना अटक केली. सात पीडित युवतींना सुधारगृहात ठेवण्यात आलंय.