मातोश्रीवर चहा प्यायला जाणार का? देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर; मोठ्या घडामोडी घडणार?
CM Fadnavis : अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत घेतली. यात त्यांना मातोश्रीवर चहा प्यायला जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. आज पुणे महापालिकेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. या प्रचाराचा भाग म्हणून अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना काही रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले. यात तुम्ही मातोश्रीवर चहा प्यायला जाणार का असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रॅपिड फायर प्रश्नांची दिली उत्तरे
रॅफिड फायर राऊंडमध्ये गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना चंद्रकांत दादा की अजित दादा? ऑन दादा कोण असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, पक्षात चंद्रकांत दादा, पक्षात अजितदादा. नाटक की सिनेमा? यावर फडणवीस म्हणाले की, सिनेमा. कारण सिनेमा डाऊनलोड करून पाहता येतो. पुण्यातील गणेशोत्सव की मुंबईतील? यावर फडणवीस म्हणाले पुण्यातील. मिसळ पाव की तर्री पोहे यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘पुण्यात आलं तर मिसळ पाव आणि नागपुरात तर्री पोहे.
मातोश्रीवर चहा प्यायला जाणार?
रॅपिड फायर राऊंडमध्ये फडणवीस यांना निवडणूक झाल्यावर कोणत्या भावाकडे चहा पिणार? राज की उद्धव? यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘माझ्यासाठी दारं बंद होती. परवा उद्धव ठाकरे म्हणाले की मातोश्रीवर टीका करणं सोडलं तर दारं उघडी होतील. मी कधीच मातोश्रीवर टीका केली नाही. माझ्यासाठी जनतेच्या हृदयातील दारं उघडली आहे. त्यामुळे मला कोणत्याही दाराची गरज उरली नाही. दोन चार दिवस हे चालेल. 16 तारखेनंतर मी कुणाकडेही चहा प्यायला जाईन.’ यामुळे आता फडणवीस आणि ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यात काही राजकीय समीकरण निर्माण होते का ते पाहणे महत्तावाचे ठरणार आहे.
ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य
मुलाखतीच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले ती, ‘कोणताही परिवार एकत्र येत असेल तर आनंद आहे. त्याबाबत मी राज ठाकरेंचे आभार मानतो त्यांनी मला क्रेडिट दिलं. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यांनी प्रयत्न केला. दोन भाऊ एकत्र आले नाही. पण मी आणले. त्यामुळे मला बाळासाहेब आशीर्वादच देतील. पण दोन भाऊ बहीण एकत्र येणार का हे माहीत नाही.’
