पुण्यात पाताल लोक तयार करणार… देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा? काय आहे बिग प्लान?
CM Fadnavis on Pune Traffic : आज पुण्यात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यात पुण्यातील वाहतूक समस्येबाबतच्या प्रश्नावर फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज पुण्यात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गिरिजा ओक यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यात पुण्यातील वाहतूक समस्येबाबतही फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय उत्तर दिले ते जाणून घेऊयात.
पुण्यात पाताल लोक तयार करणार…
पुण्यातील वाहतुकीच्या प्रश्नावर बोलताना CM फडणवीस यांनी म्हटले की, पुण्यात 23 नवीन उड्डाण पुल सुरू करणार आहोत. 8 चं काम सुरू झालं आहे. 15 चं काम येत्या तीन महिन्यात सुरू होईल. 20 ते 25 वर्ष तोडावे लागणार नाही असे उड्डाण पूल तयार करणार आहोत. पुण्यात खाली जागा उरली नाही, वरतीही जागा नाही. त्यामुळे पुण्यात पाताल लोक तयार करणार आहे. टनेल सेक तयार करणार आहोत. त्या टनेलचं कंम्पिलट प्लानिंग केलं आहे. 54 किलोमीटरचे टनेल तयार करणार आहोत. येरवडापासून ते कात्रजपर्यंत, पाषाण कोथरूड, औंध संगमवाडी टनेल तयार करणार आहोत. 32 हजार कोटी रुपये लागणार आहे. त्याचं प्लानिंग तयार केलं आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, टनेल्समध्ये पार्किंग होणार नाही. फेरिवाले राहणार नाही. मुंबईत काम केलं. त्यामुळे हे काम चांगलं आहे, योग्य असं वाटतं. पूर्वी टनेल बनवायला सहा वर्ष लागायचे आता दोन वर्षात अडीच वर्षात होतात. टनेल बोअरिंग मशीन वेगवान आल्या आहेत. हे टनेल करताना ट्विन टनेल असेल. एक येण्याचा आणि जाण्याचा असेल. ट्विन टनेल असा असतो की एकाच्या बाजूला दुसरा असतो. आता नवीन टनेल आले. एकावर एक टनेल असतो. खालून मेट्रो तर वरून गाड्या वाहतात.’
पब्लिक ट्रान्सपोर्ट मजबूत करणार
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘कोणत्याही व्यक्तीला कुठेही जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळावं यासाठी प्लानिंग केलं आहे. ट्रॅव्हल प्लान तयार करून मिळतो. सिंगल तिकीटवर मुंबईत ट्रॅव्हल प्लान केला आहे. तसाच पुण्यात करणार आहोत. तेव्हाच पुण्यातील गर्दी कमी होईल.’
