‘उद्या वीज बंद केली तर…,’ राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती…
एकाच माणसावर इतकी मेहरबानी केली गेल्याने भविष्यात किती धोके निर्माण होतील याचा दाखला यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला.
एकाच उद्योजकावर जर मेहरबानी केल्याने येणारे भविष्यातील संकटाची चुणूक मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थ येथील भाषणातून बोलून दाखवली. ते पुढे म्हणाले की एकाच व्यक्तीला ही संपत्ती दिली जात आहे. हे फक्त १० वर्षातील आहे. जगात असा एकही माणूस नसेल जो १० वर्षात इतका श्रीमंत झाला. उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाही. इतका दळभद्री नाही. मात्र, या देशात इतके उद्योगपती असताना एकाच माणसाला सर्व गोष्टी दिल्या असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. सिमेंट, वीज दिल्या. सिमेंट उद्योगात अदानी कधी नव्हताच. आज देशातील दोन नंबरचा उद्योगपती आहे. सिमेंट महाग केलं तर काही बोलू शकणार नाही. सर्व पोर्ट अदानीला. सर्व विमानतळे अदानीला. उद्या वीज बंद केली तर आपण काही बोलू शकणार नाही असेही राज ठाकरे यांनी भीती दाखवत सांगितले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे पाहा. महाराष्ट्रात २०१४ ला अदानीचा एका ठिकाणी उद्योग होता. २०२५ पर्यंत जवळ जवळ सर्व महाराष्ट्रात उद्योग झाले. राज ठाकरे यांनी प्रत्येक वर्षी महाराष्ट्रात अदानीचा उद्योग कसा निर्माण झाला हे राज ठाकरे यांनी यावेळी व्हिडिओवर दाखवलेय.

