आंबेडकरांनी एक धोका सांगितला होता, इतिहासाचा दाखला देत काय म्हणाले राज ठाकरे ?
राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे धडाकेबाज भाषण केले.त्यांनी एकाच उद्योगपतीला सर्व अधिकार दिल्याने उद्या वीजेचे दर उद्योगपती ठरवतील अशी भीतीही व्यक्त केली. यावेळी त्यांना भाषावार रचने संदर्भातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचा एक दाखला दिला.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज शिवतीर्थावर तुफान फटकेबाजी झाली. राज ठाकरे यांनी मुंबईतील जागा कशा विकल्या जात आहेत. या संदर्भात व्हिडीओ सादरीकरण करुन दाखवले. यावेळी राज ठाकरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक धोका सांगितला होता असा उल्लेख करत माहिती दिली. राज ठाकरे यावेळी म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी मांडलं होतं. आज तुम्हाला कळेल पुढे काय वाढून ठेवले आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी डॉ. आंबेडकर यांनी व्यक्त केलेली भीती बोलून दाखवली.
राज ठाकरे यावळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब यांनी लिहिले होते की उत्तर प्रदेश, बिहार यांची सारखी राज्य निर्माण करून तसेच राज्य पुनर्रचना निर्माण करून विषमता निर्माण करीत आहे. माझ्याकडे घटना समितीचे काम होते. तेव्हाचं गुपित आहे. काँग्रेसच्या बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी भाषेवरून त्यांच्यात गरमागरम चर्चा झाली. मतास हा मुद्दा टाकल्यावर ७८ विरुद्ध ७८ मतदान झालं. काय आश्चर्य आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार भविष्यात प्रबळ ठरेल. ही भीती तामिळनाडूसह इतरांनाही आहे. ही भीती राष्ट्रीय ऐक्यास घातक ठरल्याशिवाय राहणार नाही असे बाबासाहेब आंबडेकर यांनी त्यावेळी म्हटल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
हिंदी ही यूपी आणि बिहारची भाषा नाही
मला सांगायचं आहे. हिंदी ही यूपी आणि बिहारची भाषा नाही. मैथिली आणि अवधी तुमची भाषा आहे. आमच्यावर भाषा लादत असाल तर लाथ मारू. बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय हे किती घातक आहे. ही काय चाल चालू आहे. देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सर्व बाजूने संपन्न महाराष्ट्र हे सर्व बाजूने येत आहेत. हे फक्त तुमचे चावे घेत आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायचे आहे अशी भीती राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
जमिनीलाच रिअर इस्टेट म्हटले जाते…
राज यांनी यावेळी म्हणाले हिरे असतात, मोती, चांदी असते. अजून मौल्यवान गोष्टी असतात. फक्त जमिनीलीच ‘रिअल इस्टेट’ का म्हणतात..? खरी संपत्ती म्हणतात. इतर कोणत्याच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणत नाही. जमीन पायाखालची गेली तर सर्व संपलं. जगातील अनेक देश जमीन गेल्याने संपले. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारे धनिक होते. गुजराती होते, पण धनिक होते. आज हे संकट तुमच्या उंबरठ्यावर आलं आहे. कधी तुमच्या दरवाज्यावर टकटक होईल तुम्हाला कळणार नाही अशीही भीती राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.
कोकणपट्टी रिकामी केली जात आहे. जमिनीच्या जमिनी विकत घेत आहे. त्यावेळी बुलेट ट्रेनला मी विरोध केला. आताही मी विरोध केला आहे. अहमदाबादमध्ये ढोलेना नवीन शहर बसवलं जातं. मुंबईपेक्षा दीडपट मोठं आहे. तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनचे सेमी रुल्स येत आहेत. वसई विरारपासून कसे भरत येत आहेत असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
