नाशिककरांनी तुम्हाला सत्ता दिली होती पण… CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिकच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 'नाशिककरांनी तुम्हाला पण सत्ता दिली होती पण विरोधकांनी त्यावेळी काहीच केलं नाही. 2015 ला जेव्हा कुंभमेळा होता तेव्हा दोन्ही भावांनी हात वर केले होते, मनगरपालिकेच्या वतीने काहीच करता येणार नाही असं सांगितलं.
नाशिकच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘नाशिककरांनी तुम्हाला पण सत्ता दिली होती पण विरोधकांनी त्यावेळी काहीच केलं नाही. 2015 ला जेव्हा कुंभमेळा होता तेव्हा दोन्ही भावांनी हात वर केले होते, मनगरपालिकेच्या वतीने काहीच करता येणार नाही असं सांगितलं. तेव्हा आम्ही राज्यसरकारच्या वतीने कुंभमेळाव्यासाठी पैसा दिला होता आणि कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला होता’ असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे. एकही व्यक्तीचा मृत्यू त्या कुंभमेळ्यात झाला नाही असंही फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्याची खिल्ली उडवणारे हे लोकं आहेत जे ‘गंगेचं पाणी पिणार नाही म्हणून सांगतात आणि गोदाकाठी येऊन भाषणं करतात. अशा पद्धतीचं काम करणारी ही लोकं आहेत’ असं वक्तव्य करून फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा

