बिहारमध्ये रेल्वे अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू, 12 जखमी

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

पटना : बिहारच्या सहदेई बुजुर्गमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सहदेई बुजुर्गमध्ये जोगबनी-आनंद विहार टर्मिनल येथे सीमांचल एक्स्प्रेसचे 9 डबे रुळावरुन घसरलेले आहेत. या झालेल्या घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 12 प्रवासी जखमी आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना रविवारी सकाळी 3.58 वाजता बिहारच्या हाजीपूर येथे […]

बिहारमध्ये रेल्वे अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू, 12 जखमी
Follow us

पटना : बिहारच्या सहदेई बुजुर्गमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सहदेई बुजुर्गमध्ये जोगबनी-आनंद विहार टर्मिनल येथे सीमांचल एक्स्प्रेसचे 9 डबे रुळावरुन घसरलेले आहेत. या झालेल्या घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 12 प्रवासी जखमी आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना रविवारी सकाळी 3.58 वाजता बिहारच्या हाजीपूर येथे घडली आहे. ही ट्रेन जोगबनवरुन दिल्ली येत होती.

घटना स्थळावर प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफची टीम आणि रेल्वे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासोबत डॉक्टरांची टीमही दाखल झाली आहे. घटनास्थळी रेल्वेचा तुटलेला रुळ मिळाला आहे. मात्र अजूनही अपघाता बद्दलचे कारण अस्पष्ट आहे. अपघातात जखमी झालेल्या अनेकांची परिस्थिती गंभीर आहे. अपघात झाला तेव्हा घटनास्थळी अंधार होता यामुळे बचावकार्य सुरु करण्यासाठी प्रशासनाला उशिर झाला.

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्वीट करत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, बिहारच्या सहदेई बुजुर्गमध्ये जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे 9 डब्बे रुळवरुन घसरले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अपघातानंतर भारतीय रेल्वेद्वारे हेल्पलाईन नंबर ही त्यांनी ट्वीट केले आहेत.

रेल्वे हेल्पलाईन

  • सोनपूर – 06158221645
  • हाजीपूर – 06224272230
  • बरौनी – 06279232222
  • दीन दयाल उपाध्याय जंक्शन (मुगसराय) – 05412254145

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI