पाणीपुरी, पावभाजी, चायनीज विक्रेत्यांना आता नवा ‘ड्रेसकोड’

| Updated on: Mar 10, 2020 | 8:22 AM

राज्यातील सर्व हातगाड्यांवर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना यापुढे ड्रेसकोड लागू करण्यात येणार (Clean Dresscode Hawkers) आहे.

पाणीपुरी, पावभाजी, चायनीज विक्रेत्यांना आता नवा ड्रेसकोड
Follow us on

बुलडाणा : राज्यातील सर्व हातगाड्यांवर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना यापुढे ड्रेसकोड लागू करण्यात येणार (Clean Dresscode Hawkers) आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून ही मोहीम लागू करण्यात आली आहे. याची सुरुवात बुलडाण्यातून करण्यात आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर शिंगणे यांनी चिंचोले (Clean Dresscode Hawkers) चौकातील हातगाडीवर पाणीपुरी, पाव-भाजी, भेळ, चायनीज, आईस्क्रीम इत्यादी अन्नपदार्थ विक्रेत्यांना नव्या ड्रेसकोडचे वाटप केलं आहे. यात अॅप्रॉन, हँडग्लोज आणि कॅपचा समावेश आहे. तसेच या विक्रेत्यांच्या हाताची, नखांची स्वच्छता आहे की नाही याचीही स्वच्छतेच्या दृष्टीने तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय विक्रेत्यांचे परवानेही तपासले जात आहेत.

कोरोनाचा चिकन बाजाराला फटका, 60 टक्के मांसाहारप्रेमींची चिकनकडे पाठ

राज्यातील सर्व खवय्यांना स्वच्छ आणि शुद्ध खाद्यपदार्थ मिळावे यासाठी चांगल्या आणि स्वच्छ वातावरणात हातगाडीवर अन्नपदार्थांची विक्री करावी. त्यासाठी यापुढे अन्न आणि औषध प्रशासनातर्फे राज्यभर हातगाड्या तपासण्याची मोहीम राबवली जाणार आहे.

तसेच या विक्रेत्यांना कुठला त्वचा रोग आहे का, त्याचीही आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे खाद्य पदार्थ ग्राहकांना देताना हँडग्लोजचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यापुढे याचा वापर न करणाऱ्या विक्रेत्यांवर एक रुपयांपासून ते एक लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार (Clean Dresscode Hawkers) आहे.

कोरोनाची धास्ती! वाशिममध्ये साखरपुड्यातच लग्न उरकले