कोरोनाचा चिकन बाजाराला फटका, 60 टक्के मांसाहारप्रेमींची चिकनकडे पाठ

कोरोनाचा चिकन बाजाराला फटका, 60 टक्के मांसाहारप्रेमींची चिकनकडे पाठ

कोरोना व्हायरसपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या अफवांचा फटका चिकन बाजाराला बसत आहे (Corona virus affects chicken business).

चेतन पाटील

|

Mar 08, 2020 | 11:45 AM

अमरावती : कोरोना व्हायरसपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या अफवांचा फटका चिकन बाजाराला बसत आहे (Corona virus affects chicken business). कोंबड्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती पसरल्यामुळे राज्यभरासह अमरावती जिल्ह्यातही अनेकांनी चिकनला ‘बायबाय’ केलं आहे. अमरावती जिल्ह्यात 60 टक्के मांसाहारप्रेमींनी चिकन खाणं बंद केल्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पोल्ट्रीफार्मसह चिकन बाजाराला कोट्यवधींचा फटका बसत आहे (Corona virus affects chicken business). तरी राज्य शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांकडे लक्ष देऊन प्रति पक्षी 156 रुपयांची मदत करावी, अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.

चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशी चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरली आणि व्हायरसच्या भीतीने मांसाहारींनी अचानक चिकन खायचे बंद केले. अमरावती जिल्ह्यात सध्या 16 लाख बॉयलर कोंबड्या आणि 10 लाख प्रतिदिन अंडी उत्पादन सुरु आहे. मात्र त्याच्या खप सध्या निम्मा झाला आहे. यामुळे पोल्ट्रीफार्म धारक मोठ्या अडचणीत सापडले असून व्यवसायला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

अमरावती शहरातल्या हॉटेल व्यावसायिकांकडून दररोज 10 ते 12 टन चिकनची मागणी व्हायची. मात्र, सध्या हेच प्रमाण 60 टक्क्यांनी घसरलं आहे. चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेतच, मात्र पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही संकट ओढावलं आहे. पोल्ट्री व्यवसायिकांचे 165 रुपये प्रति पक्षी सध्या नुकसान होत आहे. याशिवाय सध्या अंड्यालाही भाव नसून केवळ 2 रुपये 70 पैसे प्रति नग दराने विकावे लागत आहे.

कोंबडीची छोटी पिल्लं अगोदर 20 ते 25 रुपये दराने विकली जायची. आता ती दहा ते बारा रुपयांवर आली आहेत. त्यामुळे पोल्ट्रीफार्म मालक अडचणीत आले आहेत. आपल्याकडे चिकन ज्या पद्धतीने शिजवले जाते, त्यानुसार त्यात कोणतेही विषाणू जिवंत राहण्याची शक्यताच नाही. याशिवाय कोंबडी किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कोरोना व्हायरस असल्याची भारतात चिन्हं नाहीत. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांनी मनामध्ये अजिबात शंका बाळगू नये, असं आवाहन अमरावती जिल्हा पोल्ट्री असोशिएअशनच्या वतीने करण्यात आलं आहे.

दरम्यान, शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी पोल्ट्री फार्म सुरु केले आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीने हा जोडधंदा उद्ध्वस्त होण्याकडे वाटचाल करत आहे. ही अवस्था एकट्या अमरावती जिल्ह्याची नाही तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात हा अफवेचा व्हायरस झपाट्याने पसरत आहे. मांसाहारींनी अशा अफवांना बळी न पडता चिकन खात राहावं, असं आवाहन केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

कोंबडी ‘ताटातून’ पळाली! कोरोना व्हायरसचा चिकन बाजाराला फटका

कोरोनाची भीती घालवण्यासाठी पुण्यात चिकन फेस्टिवल, मांसाहारप्रेमीच्या रांगा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें