Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलला

| Updated on: Jun 19, 2020 | 11:54 AM

दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 2 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन करणार होते. (Ram Mandir trust suspends plan to start construction of temple in Ayodhya)

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलला
Follow us on

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने भूमीपूजन आणि निर्माण कार्याला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. (Ram Mandir trust suspends plan to start construction of temple in Ayodhya)

2 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन करणार होते. दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी भूमीपूजन करणार होते. आता अनिश्चित काळासाठी भूमीपूजन लांबणीवर पडले आहे.

सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव वाढत आहे. चीनने भारताच्या सीमारेषेवर घुसखोरी केली आणि संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्ट भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

अयोध्येतली माती 2 जून रोजीच दिल्लीला आणण्यात आली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ही माती स्वाधीन केली होती.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल”

हेही वाचा : राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन

भारताच्या प्राणवायूत, आदर्शात सर्वत्र प्रभू श्रीराम आणि अयोध्येचं ऐतिहासिक महत्त्व आहे. भविष्यात भाविकांची संख्या आणि श्रद्धा पाहता, सरकारने निर्णय घेतला आहे, अयोध्या कायद्यानुसार अधिगृहित सर्व जमीन 67 एकर ज्यामध्ये आत आणि बाहेरील अंगणाचा समावेश आहे, ती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राला सोपवण्यात येईल, असं मोदींनी सांगितलं होतं.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सरकारने जन्मभूमीत राम मंदिर उभारण्यासाठी योजना तयार केली आहे. श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र स्थापन करण्यात येईल. हा ट्रस्ट पूर्णपणे स्वतंत्र असेल. सुप्रीम कोर्टाचे निर्देश, अनेक चर्चांनंतर आम्ही अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन मंजूर केली आहे, असंही मोदींनी सांगितलं होतं. (Ram Mandir trust suspends plan to start construction of temple in Ayodhya)