‘गो कोरोना गो’वर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Mar 10, 2020 | 6:38 PM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Ramdas Athawle on Go Corona Go).

गो कोरोना गोवर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Ramdas Athawle on Go Corona Go). यात ते ‘गो कोरोना गो’च्या घोषणा देताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन त्यांच्यावर जोरदार विडंबनात्मक टीका होत आहे. यावर आता स्वतः रामदास आठवलेंनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का? असा सवाल आठवलेंनी व्यक्त करत आपल्या घोषणांचं समर्थन केलं आहे.

रामदास आठवले म्हणाले, “कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या असं म्हणणार आहे का? कोरोना कम असं मी म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेल. यावर टीका करण्याची आवश्यकता नाही. मी कुणावरही टीका करणार नाही. कोरोना गो म्हणजे कोरोनाने येथून जावं अशी भूमिका मी घेतली आहे. कोरोनाने येथे येऊ नये आणि आला असेल तर येथून जावं, अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे.”

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे साडेतीन हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना जगभरात पसरतो आहे. त्यामुळे चीनचे भारतातील अॅम्बेसिडर यांच्या उपस्थितीत आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. त्यात आम्ही कोरोना गो असं सांगितलं होतं. याचा अर्थ कोरोना फक्त भारतातून नाही, तर जगातून जा असा आहे. अशा पद्धतीने कोरोनाला नष्ट केलं पाहिजे, घालवलं पाहिजे म्हणून त्या घोषणा दिल्या. हा रोग अत्यंत भयंकर आहे. म्हणून कोरोना गो अशी भूमिका मी घेतली, असंही रामदास आठवले यांनी नमूद केलं.

Ramdas Athawle on Go Corona Go