रत्नागिरीत 24 तासात 36 जणांना कोरोना, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

| Updated on: May 31, 2020 | 3:08 PM

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 270 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनाचे दोन बळी गेले (Ratnagiri Corona Cases Latest Update) आहेत.

रत्नागिरीत 24 तासात 36 जणांना कोरोना, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 36 जणांना कोरोनाची लागण (Ratnagiri Corona Cases Latest Update) झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 270 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील कोरोनाबळींची संख्या 7 वर पोहोचली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज (31 मे) दुपारी 14 नव्या रुग्णांची भर पडली (Ratnagiri Corona Cases Latest Update) आहे. यात रत्नागिरीतील 4, कामथे, लांजा, गुहागरमध्ये प्रत्येकी 3 रुग्णांचा समावेश आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 5744 जणांचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

तालुका  –  रुग्ण

  • रत्नागिरी – 71
  • मंडणगड – 23
  • दापोली – 26
  • संगमेश्वर – 35
  • खेड – 28
  • गुहागर – 21
  • चिपळूण – 41
  • राजापूर – 19
  • लांजा – 5

रत्नागिरी जिल्ह्यात काय घडतंय ?

1) रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी
2) गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे 36 नवे रुग्ण
3) रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 270 वर
4)रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे 71 रुग्ण
5) जिल्ह्यात तपासणीसाठी घेण्यात आलेले नमुने 5744
6) रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा सुरु
7) राजापूर तालुक्यातील 193 कामगारांची घरवापसी
8) कोरोनाच्या पाश्वभूमीवर आडिवरे गावात ग्रामस्थांचे समुपदेशन, वाद टाळण्यासाठी उपक्रम
9) लाॅकडाऊनच्या पाश्वभूमीवर कवडीमोल भावाने आंबा कॅनिंगला, 20 रुपये किलो दर
10) कोरोनाच्या पाश्वभूमीवर चिपळूणातील 70 जणांचे रक्तदान

संबंधित बातम्या : 

आर्थर रोड जेलच्या अधीक्षकांची बदली, जेलमध्ये 200 पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण

‘केईएम’मधून 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता, 10 दिवसानंतरही शोध लागेना