AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raymond Share : सिंघानिया परिवाराच्या वादाचा रेमंडच्या शेअरला फटका, नेमका काय आहे हा वाद?

Raymond Share, Gautam Singhania गेल्या पाच दिवसांत रेमंड कंपनीचे शेअर्स 132.70 रुपयांनी घसरले आहेत. बुधवारीही तो 4 टक्क्यांनी घसरून 1671 रुपयांवर बंद झाला. रेमंडचे शेअर्स गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये 12.5 टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचे बाजारमूल्यही 1500 कोटी रुपयांनी घसरून 11124.80 कोटी रुपयांवर आले आहे. गुरुवारी तो 1675 रुपयांवर चालू आहे. यासाठी कंपनीचे मालक गौतम सिंघानिया यांचा कौटूंबीक वाद कारणीभूत आहे.

Raymond Share : सिंघानिया परिवाराच्या वादाचा रेमंडच्या शेअरला फटका, नेमका काय आहे हा वाद?
रेमंडImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 23, 2023 | 4:30 PM
Share

मुंबई : कौटूंबीक वाद चव्हाट्यावर आला की त्याचा फटका हा हमखास बसतो. याची अनेक उदाहरणं देखील आपल्यासमोर आहेत. व्यावसायीक क्षेत्रात अशाच एका वादाची जोरदार चर्चा सुरू आहे.  गौतम सिंघानिया (Gautam Singhania)  आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यातील वादाचा रेमंड समूहावर खूप वाईट परिणाम होतांना दिसत आहे. नवाज मोदी यांनी गौतमपासून वेगळे होण्यासाठी संपत्तीतील 75 टक्के वाटा मागितला होता. गौतम सिंघानिया कौटुंबिक ट्रस्ट तयार करून ही रक्कम देण्यास तयार होते. पण नवाजने नकार दिला. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या वादाचा फटका कंपनीला बसत आहे. रेमंडच्या शेअरमध्ये जवळपास आठवडाभरापासून सातत्याने घसरण होत आहे. यामुळे कंपनीच्या बाजारमुल्यात थोडी थोडकी नाही तर 1500 कोटी रुपयांनी घसरण झाली आहे.

रेमंडच्या शेअरमध्ये होत आहे सातत्याने घसरण

गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स 132.70 रुपयांनी घसरले आहेत. बुधवारीही तो 4 टक्क्यांनी घसरून 1671 रुपयांवर बंद झाला. रेमंडचे शेअर्स गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये 12.5 टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचे बाजारमूल्यही 1500 कोटी रुपयांनी घसरून 11124.80 कोटी रुपयांवर आले आहे. गुरुवारी तो 1675 रुपयांवर चालू आहे.

नवाज मोदी हे रेमंडमध्ये आहेत समिती सदस्य

रेमंडमध्ये प्रवर्तकांची भागीदारी 49.11 टक्के आहे. गौतम सिंघानिया हे कंपनीचे एमडी आणि चेअरमन आहेत. नवाज मोदी हे देखील समितीत बिगर कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्याकडे रेमंडचे सुमारे 2,500 शेअर्स आहेत. त्यामुळे ही कौटुंबिक समस्या राहण्याबरोबरच कंपनीशी संबंधित बाबही बनली आहे. गौतम सिंघानिया यांनी 13 नोव्हेंबर रोजी नवाज मोदींपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. रेमंड ग्रुपचा व्यवसाय फॅब्रिकपासून रिअल इस्टेटपर्यंत विस्तारलेला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न सुमारे 8,215 कोटी रुपये होते. या काळात कंपनीला 537 कोटी रुपयांचा नफाही झाला होता.

पत्नी नवाजने मागितला आहे 75 टक्के हिस्सा

नवाज मोदींनी गौतम सिंघानियापासून वेगळे होण्यासाठी संपत्तीतील ७५ टक्के वाटा मागितला आहे. सिंघानिया ट्रस्ट स्थापन करून ही रक्कम देण्यास तयार होते. पण, नवाजने नकार दिला. गौतमच्या मृत्यूनंतर ही रक्कम नवाजकडे गेली असती.

नवाजने गौतमवर आपल्याला आणि आपल्या मुलीला मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. नवाजचा दावा आहे की गौतमला मारहाणीचा अहवाल पोलिसात नोंदवायचा नव्हता. तथापि, रिपोर्ट्सनुसार, नीता अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या मदतीने हा अहवाल दाखल केला जाऊ शकतो. या सर्व वादामुळे गुंतवणूक दारांनी काढता पाय घेतला आहे. परिणामी कंपणीच्या भांडवलात घसरण झाली आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?