खरंच विमानाला हिऱ्यांचा साज?

दुबई : एमिरेट्स एअरलाईन या कंपनीच्या विमानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये विमान हिऱ्यांनी सजवलेला दिसतो आहे. मात्र, अनेकांना हे विमान खरे आहे की खोटे याबाबत शंका होती. त्यामुळे सोशल मीडियावर युजर्स हा फोटो खरा आहे की, खोटा हे विचारत असताना, एमिरेट्स एअरलाईनने ट्वीट करत, हा फोटो कुणीतरी […]

खरंच विमानाला हिऱ्यांचा साज?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

दुबई : एमिरेट्स एअरलाईन या कंपनीच्या विमानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये विमान हिऱ्यांनी सजवलेला दिसतो आहे. मात्र, अनेकांना हे विमान खरे आहे की खोटे याबाबत शंका होती. त्यामुळे सोशल मीडियावर युजर्स हा फोटो खरा आहे की, खोटा हे विचारत असताना, एमिरेट्स एअरलाईनने ट्वीट करत, हा फोटो कुणीतरी एडिट केल्याचे स्पष्ट केले आहे.

एमिरेट्स एअरलाईन्सने ट्वीटमध्ये ‘ब्लिंग 777’ च्या सारा शकील’ने  हा फोटो तयार केला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे एमिरेट्स विमान कंपनीने केलेल्या या ट्वीटमुळे हा फोटो खोटा असल्याचं लक्षात येतं.

दुसरीकडे खलीज टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, सारा शकील हा क्रिस्टल आर्टिस्ट इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फेमस आहे. तर इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल 4 लाख 80 हजार इतके फॉलोअर्स आहेत.

पहिल्यांदा हा फोटो शकील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि पाहता पाहता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सुरुवातीला व्हायरल झालेला फोटो खरा आहे की खोटा याबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांना शंका होती. मात्र, ही शंका ज्या विमान कंपनीचा फोटो शेअर झाला त्या विमान कंपनीने ट्वीट करत हा खरा नसून ‘सारा शकील’ने तयार केला असल्याची माहिती दिली.