AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्पृश्यता निवारणाचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अफाट कार्याचे स्मृतिदिनी स्मरण!

कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता काम करणारे थोर समाजसेवक म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. त्यांचा आज 2 जानेवारी रोजी स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या अफाट कार्याची ओळख.

अस्पृश्यता निवारणाचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अफाट कार्याचे स्मृतिदिनी स्मरण!
Maharshi Vitthal Ramji Shinde
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 7:05 AM
Share

नाशिकः कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता काम करणारे थोर समाजसेवक म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. त्यांनी इंग्लंडला जावून त्या काळी उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर भारतात परतल्यानंतर मोठमोठाले मान-सन्मान आणि नोकऱ्या नाकारून अस्पृश्यता निवारण आणि स्वातंत्र्यलढ्यात वाहून घेतले. शेतकरी चळवळीलाही बळ दिले. या थोर समाजसेवकाचा आज 2 जानेवारी रोजी स्मृतिदिन. त्यांच्या अफाट कार्याची ही ओळख.

इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्रारंभी जमखंडी येथे शिक्षकाची नोकरी केली. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यासाठी त्यांना प्रार्थना समाजाने मदत केली. भारतात परतल्यानंतर त्यांनी मिळणारे सारे मान सन्मान, उच्च अधिकाराच्या जागा नाकारल्या आणि स्वतःला प्रार्थना समाजाच्या कार्याला वाहून घेतले. आपल्या समाजाला अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, कर्मकांड, रुढी आणि परंपररांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अवघे जीवन समर्पित केले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी

विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वातंत्र्यलढात सहभाग घेतला. अस्पृश्यता निवारणाचे काम हाती घेतले. अस्पृश्य समजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे, अस्पृश्यांना नोकरीची संधी मिळवून देणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना खऱ्या धर्माची शिक्षण देणे, त्यांच्या प्रगती आणि ज्ञानाची तहान निर्माण करणे यासाठी त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना केली. अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे ही या मिशनची वैशिष्ट्ये होती.

राज्यभर काम

‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या. सोबतच 1933 मध्ये ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ लिहिला. त्याद्वारे या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचे काम केले.

शेतकरी चळवळ

विठ्ठल रामजी शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. त्यांना जागृत आणि संघटित करण्यासाठी त्या काळात शेतकरी परिषदांचे आयोजन केले. 1920 ते 1926 या काळात त्यांनी शेतकरी चळवळ उभी केली, पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले आणि चळवळ थांबली. आपल्या समाजातील पददलित, उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते झटले. मात्र, आयुष्यभर त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली. या थोर समाजसेवकाने 2 जानेवारी 1944 रोजी या जगाचा निरोप घेतला.

विपुल लेखन

वि. रा. शिंदे यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात भारतीय ‘अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे 375 पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत आहे. इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. ब्राह्मो समाजास शंभर वर्षे झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्मो उपासना केंद्रे चालवणाऱ्या रवींद्रनाथांना भेटले. त्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्मो धर्मावर भाषणे दिली.

वि. रा. शिंदे यांची ग्रंथसंपदा

– भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न -१९३३ – माझ्या आठवणी व अनुभव – भागवत धर्माचा विकास – मराठ्यांची पूर्वपीठिका – कानडी – मराठी संबंध – कोकणी – मराठी संबंध – Untouchable of India – History of Parihars – Thiestic directory

इतर बातम्याः

Corona Third Wave | ‘तेव्हा ऑटोमॅटिक लॉकडाऊन लागणार!’ आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं आणि मोठं विधान

मोठी बातमी: मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, 500 चौ.फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ !

Corona : बॉलिवूडमधल्या ‘या’ सेलिब्रिटींना झालेला कोरोनाचा संसर्ग, खबरदारी घेत केली यशस्वी मात! पाहा Photos

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.