‘भाऊ कदमसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई: विनोदी अभिनेता भाऊ कदमच्या नशीबवान सिनेमामागील ससेमीरा कायम आहे. आधी थिएटरसाठी हतबल झालेल्या भाऊ कदमने फेसबुकवर आपली हतबलता व्यक्त केली. त्यानंतर आता नशीबवानवर पुन्हा एक नवं संकट आलं आहे. या सिनेमावर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार संघटनेने आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर चित्रपटाशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सिनेमात सफाई […]

भाऊ कदमसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा
Follow us on

मुंबई: विनोदी अभिनेता भाऊ कदमच्या नशीबवान सिनेमामागील ससेमीरा कायम आहे. आधी थिएटरसाठी हतबल झालेल्या भाऊ कदमने फेसबुकवर आपली हतबलता व्यक्त केली. त्यानंतर आता नशीबवानवर पुन्हा एक नवं संकट आलं आहे. या सिनेमावर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार संघटनेने आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर चित्रपटाशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या सिनेमात सफाई कामगारांबाबत अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप स्वतंत्र म्युनिसिपल कामगार संघटनेने केला आहे. त्यामुळे कामगारांची प्रतिमा मलिन होत असून, या सिनेमाचं प्रदर्शन थांबवावं अशी मागणी करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या सिनेमात जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचीही प्रतिमा मलिन केल्याचा दावा सफाई कामगार संघटनेने केला आहे.

VIDEO: भाऊ कदमने आगरी समाजाची माफी मागितली

त्यामुळे या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकरांविरोधात गुन्हा दाखल करा, या सिनेमाचं प्रदर्शन रोखा, अशी मागणी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनने केली आहे.

भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असलेला ‘नशीबवान’ हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात भाऊ कदम यांच्यासोबत, अभिनेत्री मिताली जगताप-व्हराडकर, नेहा जोशी, अभिनेते जयवंत वाडकर इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनील वसंत गोळे यांनी केले आहे. या चित्रपटात भाऊ कदम यांनी महानगरपालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे.

‘नशीबवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शो मिळत नसल्याने हतबल झालेल्या भाऊ कदम यांनी फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती. ‘परभाषीय चित्रपटांसमोर आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं’, असा खेद त्यांनी व्यक्त केला होता. तसेच, ज्या ‘डोंबिवलीचा मी’ म्हणून मी गर्वाने सांगतो, तिथेसुद्धा ‘नशीबवान’ ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :  

नशीबवान’ भाऊ कदमची हतबल पोस्ट

महाराष्ट्राची शोकांतिका! पु. ल. देशपांडेंच्या बायोपिकलाच थिएटर मिळेना  

VIDEO: भाऊ कदमने आगरी समाजाची माफी मागितली