AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नशीबवान’ भाऊ कदमची हतबल पोस्ट

मुंबई : महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी सुरुच आहे. ‘आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर’, ‘भाई’, ‘लव्ह यू जिंदगी’ या चित्रपटांनंतर आता अभिनेता भाऊ कदमच्या ‘नशीबवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही झगडावं लागत आहे. ‘नशीबवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शो मिळत नसल्याने हतबल झालेल्या भाऊ कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. ‘परभाषीय चित्रपटांसमोर आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं’, असा खेद त्यांनी व्यक्त […]

‘नशीबवान’ भाऊ कदमची हतबल पोस्ट
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी सुरुच आहे. ‘आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर’, ‘भाई’, ‘लव्ह यू जिंदगी’ या चित्रपटांनंतर आता अभिनेता भाऊ कदमच्या ‘नशीबवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही झगडावं लागत आहे. ‘नशीबवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शो मिळत नसल्याने हतबल झालेल्या भाऊ कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. ‘परभाषीय चित्रपटांसमोर आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं’, असा खेद त्यांनी व्यक्त केला. तसेच, ज्या ‘डोंबिवलीचा मी’ म्हणून मी गर्वाने सांगतो, तिथेसुद्धा ‘नशीबवान’ ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी शो न मिळणे ही खरी शोकांतिका आहे. या चित्रपटाला आतापर्यंत फक्त 20-22 थेएटर मिळाले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांची उपेक्षा सुरु असल्याची खंत भाऊ कदम यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

काय आहे भाऊ कदम यांची फेसबुक पोस्ट?

एखादा परभाषीय चित्रपट ‘हिट’ होऊन जातो आणि रातोरात आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातुन पायउतार व्हावं लागतं. वाटेल ती आणि वाटेल तशी समीकरणं मांडून हे दाखवलं जातं की तुमचा ‘मराठी’ चित्रपट चालतच नाही. मध्यमवर्गीयांसाठी बनवलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात, जेव्हा आमचा मराठी चाकरमानी माणूस आपापल्या कामाच्या ठिकाणी असतो. मग बोंब उठवली जाते की, तुमचा मराठी चित्रपट बघायला तुमचेच मराठी प्रेक्षक येत नाहीत. ‘नशीबवान’ च्या निमित्ताने मला आणि माझ्या निर्मात्यांना ह्याचीच प्रचिती आली.

ज्या डोंबिवलीचा उल्लेख मी ‘हवा येऊ द्या’च्या प्रत्येक भागात करतो, ज्या ‘डोंबिवलीचा मी’ म्हणून मी गर्वाने सांगतो, तिथेसुद्धा ‘नशीबवान’ ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही. आमचा संपूर्ण चित्रपट मुलुंडमध्ये चित्रित झाला आहे. तिथेही एकाही चित्रपटगृहात ‘नशीबवान’ ला स्थान मिळाले नाही. कित्येक लोक चित्रपटगृहात जाऊन परत फिरले आणि ऑनलाइन बुकींग करून गेलेल्यांना शो कॅन्सल झाल्याचे कारण देऊन ‘हिट’ झालेल्या हिंदी चित्रपटाची तिकिटं त्यांच्यावर लादली गेली. एका दक्षिणात्य चित्रपटाने ह्या आठवड्या अखेरीस मुंबईत सव्वाशेहून अधिक शो अडवले. पण आपण आपल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी साधा एक शो राखू शकत नाही. काबाडकष्टाने चित्रपट तयार करणारे निर्माते आता प्रदर्शनासाठीही खस्ता खात आहेत. एक-एक चित्रपटगृह मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.

ज्या हिंदी चित्रपटसृष्टीला खत पाणी घालून आपल्या महाराष्ट्राने जोपासलं, मोठं केलं ती आपल्या मराठी सिनेमाची अशीच पायमल्ली करत राहणार का? आपल्या मराठी चित्रपटाला निदान महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का?

भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असलेला ‘नशीबवान’ हा चित्रपट मागील आठवड्यात 11 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात भाऊ कदम यांच्यासोबत, अभिनेत्री मिताली जगताप-व्हराडकर, नेहा जोशी, अभिनेते जयवंत वाडकर इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनील वसंत गोळे यांनी केले आहे. या चित्रपटात भाऊ कदम यांनी महानगरपालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे.

महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही बऱ्याचदा मोठा चित्रपट असेल तर मराठी चित्रपटांना डावलण्यात आलंय. पुलंच्या आयुष्यावर आधारित ‘भाई… व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाला प्रदर्शनासाठी झगडावं लागलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यावर संताप व्यक्त केला होता. असे एक ना अनेक मराठी चित्रपटांना या गळचेपीला बळी पडावे लागते. मराठी भाषिक राज्यात परभाषिय चित्रपटांना शो मिळतो मात्र मराठी चित्रपटांना मिळत नाही, हे खरंच दुर्दैव आहे.

संबंधीत बातम्या :

महाराष्ट्राची शोकांतिका! पु. ल. देशपांडेंच्या बायोपिकलाच थिएटर मिळेना

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.