AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 डिसेंबर रोजी अमेरिकेत मोठं काहीतरी होणार, युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा बॉम्ब, नवीन वर्षापूर्वी जगावर आता कोणते संकट?

Zelenskyy And Trump: Epstein Files चे भूत मानगुटीवर बसलेले असतानाच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमर झेलेन्स्की यांनी अजून एक बॉम्ब टाकला आहे. उद्या 28 डिसेंबर रोजी अमेरिकेत मोठं काहीतरी घडणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे जगाचे त्याकडं लक्ष लागलं आहे. नवीन वर्षापूर्वी आता कोणते संकटं आले याची चर्चा सुरू झाली आहे.

28 डिसेंबर रोजी अमेरिकेत मोठं काहीतरी होणार, युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा बॉम्ब, नवीन वर्षापूर्वी जगावर आता कोणते संकट?
रशिया, युक्रेन, अमेरिका
| Updated on: Dec 27, 2025 | 8:51 AM
Share

Zelenskyy And Trump Meeting : Epstein Files ने सध्या अमेरिकेत मोठा धुमाकूळ घातला आहे. एपस्टिन फाईल्समध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही गंभीर आरोप लावण्यात येत आहेत. त्यांचे तरुणींसोबतचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत. त्यातच युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमर झेलेन्स्की यांनी उद्या 28 डिसेंबर रोजी अमेरिकेत मोठं काहीतरी घडणार असं जाहीर करुन जगाचं लक्ष वेधलं आहे. नवीन वर्षांपूर्वीच जगावर अजून कोणतं नवीन संकटं येऊन ठेपलं याची चर्चा सुरू झाली आहे. सत्तेवर येताच अर्ध्या तासातच रशिया आणि युक्रेन या दोन देशातील युद्ध थांबवण्याची वल्गना ट्रम्प यांनी केले होते. आता त्यांना सत्तेवर येऊन काळ लोटला आहे. पण रशिया-युक्रेनमधील वाद काही संपलेला नाही. त्याचवेळी झेलेन्स्की यांचं वक्तव्य मोठं मानलं जात आहे.

28 डिसेंबर रोजी बैठक

रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरू होऊन चार वर्षे झाली आहेत. दोन्ही देशांना या युद्धाने मोठा फटका बसला आहे. दोन्ही देशांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन्ही देशात अनेकदा शांतता करारावर चर्चा झाली. पण ही शांती वार्ता फिस्कटली आहे. दोन्ही नेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. पण तरीही दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबलेले नाही. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये शांतता करारात ज्या अटी आणि शर्ती आहे, त्यावरून शांततेचं घोडं अडलेले आहे. त्यामुळे शांततेची बोलणी वारंवार अयशस्वी ठरत आहे. त्यातच उद्या 28 डिसेंबर रोजी झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात एक बैठक होत आहे. झेलेन्स्की काही अटीवर राजी झाले आहेत. त्यामुळे युद्धाला विराम मिळण्याची आणि जगातील एक युद्ध थांबणार आहे.

काय होऊ शकतं?

पुतिन यांनी ट्रम्प यांच्या शांतता करारावर एक गोष्ट स्पष्ट केली आहे. त्यानुसार, रशियाने युक्रेनचा जो भाग बळकावला आहे. तो त्यांना परत करण्यात येणार नाही. त्यावरुन मोठा खल झाला. झेलेन्स्की यांनी ही अट मान्य करण्यास नकार दिला. हा सार्वभौमत्वाशी तडजोड कशी करणार असा सवाल झेलेन्स्की यांनी केला होता. पण युक्रेनवरील हल्ल्यामुळे अनेक शहरात वीज पुरवठा खंडीत झाला आणि ख्रिसमसचा सण येथील नागरिकांना थंडीत अंधारात कुडकुडत साजरा करावा लागला. त्यानंतर झेलेन्स्की यांनी मोठा निर्णय घेण्याचा विचारात असल्याचे समजते. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी सुद्धा काही तडजोडीवर एकमत होण्याचे संकेत दिले आहे. मानवतेच्या आधारावर काही अटी आणि शर्तीवर एक पाऊल मागे येण्याचे निश्चित केल्याचे समजते. त्यामुळे नवीन वर्षापूर्वी कदाचित एक युद्ध संपण्यासाठी ठोस पाऊल टाकले जाऊ शकते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.