Relationship Essential Tips: मुली मनातल्या मनात नोटीस करतात ‘या’ गोष्टी…जाणून घ्या, मुलींना इंप्रेस करण्यासाठी आवश्यक गुण सारांश

मुलं नेहमीच विचार करतात की, मुलींना कसे इंप्रेस करायचे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या काही वाईट सवयीमुळे मुली इंप्रेस होण्याऐवजी चिडतात. कारण त्यांना मुलांच्या त्या वाईट सवयी आवडत नसतात. जाणून घ्या, नात्यात मुलांच्या स्वभावातील कोणत्या गोष्टी मुलींना अधिक आवडतात.

Relationship Essential Tips: मुली मनातल्या मनात नोटीस करतात ‘या’ गोष्टी...जाणून घ्या, मुलींना इंप्रेस करण्यासाठी आवश्यक गुण सारांश
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 4:26 PM

मुंबईः मुलींशी बोलणे जरी मुलांना फारच सोपे वाटत असले तरी, त्यांना हे माहीत नसते की..मुली त्यांच्याशी बोलण्या पूर्वी अनेक गोष्टींचे निरीक्षण करतात. काही गोष्टींमुळे त्या तुमच्या व्यक्तीमत्वाबाबत (About personality) जाणून घेतात. कोणत्याही नव्या नात्यासाठी तुमच्या त्याच फस्ट इंप्रेशनवर नात्याचे भवितव्य (The future of the relationship) अवलंबुन असते. बहुतांश वेळेस मुलींनाच तुमच्या काही गोष्टी आवडत असतील, तर काही वेळा काही सवयी त्यांना मुळीच आवडत नाहीत. अशा परीस्थितीत मुलांना नेहमीच उत्सुकता असते की, मुलींना मुलांच्या नेमक्या कोणत्या गोष्टी आवडतात ज्याने ते मुलींना इंप्रेस (Impress the girls) करू शकतील. तुम्ही देखील कुठल्या मुलीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर, रिलेशनशिप बाबतच्या या काही टिप्स्‌चा तुम्हाला निश्चीतच फायदा होऊ शकतो. जाणून घ्या, मुलींना कोणत्या व्यक्तीमत्वाची मुले अधिक आवडतात.

1) जी मुलं कॉन्फिडंट असतात (Boys who are confident)

प्रत्येकच मुलीला आत्मविश्वास (कॉन्फिडंट) असलेले मुलंच जास्त आवडतात. जर तुमच्यात आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासाचा तुमच्या वागण्या बोलण्यावर प्रभाव असेल तर सहाजिकच बाब आहे की, कोणीही तुमच्याकडे आकर्षित होईल.

2) मस्करी करणारे मुलं (Laughter also likes to come)

मजा-मस्करी केल्या शिवाय तुम्ही बोरींग वाटू लागतात. मुलगा असो वा मुलगी, त्याला थोडं का असेना गंमतीशीर असणे आवश्यक आहे. तुमच्या ग्रुप मध्ये जर एखादा कॉमेडीयन स्वभावाचा व्यक्ती असेल, नेहमीच सर्वांना हसवत ठेऊ शकत असेल तोही, मुलींना खूप आवडतो. जर तुमचाही स्वभाव तसा असेल तर आपण कौतुकास पात्र आहात.

3. वेल ड्रेस्ड तरुण(Well dressed boys)

कोणत्याही रिलेशनमध्ये फॅशन आवश्यक फॅक्टर नाही. परंतु, जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये आहात, किंवा तसा प्रयत्न करत असाल तर..तुमचा ड्रेसिंग सेन्स ती नक्कीच नोटीस करत असेल. अर्थात प्रत्येकच वेळेस मुली ड्रेसिंग सेन्स नोटीस करतीलच असे नाही..पण तुमच्या हाच ड्रेसिंग सेन्स तुम्ही तिच्यावर किती लक्ष देतात याचा सहज अंदाज ती लावू शकते.

4) फिटनेसवर लक्ष केंद्रित करणारी मुले(Boys who focus on fitness)

बहुतांश मुलींना स्वतः वर लक्ष ठेवणारे मुलं आवडतात. तोच, जर स्वतःच्या शरीरयष्टी बाबत जागरूक असेल व्यायामाचा त्याला छंद असेल तर मग सेान्याहुन पिवळे. कारण जो, स्वतःविषयी काळजी घेत असेल तो त्यांचीही काळजी घेईलच, चांगल्या आरेाग्यासाठी वेळ काढणारा तरुण त्यांच्यासाठी ही आयुष्याचे योग्य नियोजन आखेल याचा विश्वास त्यांना असतो.

5) नोकरदार, उद्योगी मुल (Good career guy)

प्रत्येकच तरुणीला यशस्वी जोडीदारच हवा असतो. जो त्याच्या नोकरी व्यवसायात यशस्वी आहे त्याच्याकडे मुली अधिक आकर्षित होतात. तेव्हा तीला तुमच्या पगाराशी, स्टेटस्‌ शी काही फरक पडत नसला तरी, केवळ तुमच्या जिवनातील यशस्वी दृष्टीकोनामुळे तुमच्यातील परिपक्वता आणि आयुष्याप्रती गांभीर्य याचा बोध होतो.

६) ऐकून घेणारे तरुण (Listening boy)

मुली खूपच संवेदनशील आणि भावुक असतात. दिवसभर त्या ज्या गोष्टींचा विचार करतात त्या घडतीलच असे होत नाही. अर्थात मुलींचा स्वप्नरंजक स्वभाव असतो. मुलींची अपेक्षा असते की, कोणीतरी त्यांना लक्षपुर्वक ऐकेल..त्याच्या बोलण्याला हुंकार भरेल. जर, तुम्हीही तसं करत असाल तर मग, तुम्ही तिच्या गुडबुक मध्ये आलेच म्हणून समजा. नेहमीच लक्षात ठेवा की एकमेकांशी संवाद साधल्या शिवाय कुठलेच नाते मजबूत होवु शकत नाही.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.