20 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची घोषणा

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली आहे. नव्या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असेल. “हिरवा आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण असलेला रंग 20 रुपयाच्या नव्या नोटेला असेल. नोटेच्या मागील बाजूस एलोराच्या गुहांचे चित्र छापण्यात येईल”, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले. ही नोट […]

20 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची घोषणा
20 रुपयांची नोट बदलेल तुमचे नशीब; घरबसल्या कमवू शकता हजारो रुपये
Follow us on

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली आहे. नव्या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असेल.

“हिरवा आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण असलेला रंग 20 रुपयाच्या नव्या नोटेला असेल. नोटेच्या मागील बाजूस एलोराच्या गुहांचे चित्र छापण्यात येईल”, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले. ही नोट 63mmx129mm एवढ्या आकाराची असेल.

नोटेच्या पुढील बाजूस काय असेल?

  1. देवनागरी लिपीत 20 रुपये लिहिलेले असेल
  2. नोटेच्या मध्यभागी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो असेल
  3. मायक्रो लेटर्समध्ये ‘RBI’, ‘भारत’, ‘INDIA’ आणि ’20’ लिहिले असेल
  4. आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी नोटेवर असेल
  5. नोटेच्या उजव्या बाजूला अशोकस्तंभाचं चिन्ह असेल.

नोटेच्या मागील बाजूस काय असेल?

  1. डाव्या बाजूला नोट प्रिंटिंगचं वर्ष असेल
  2. स्वच्छ भारतचा लोगो आणि घोषणाही असेल
  3. भाषांची पट्टी असेल
  4. एलोरा गुहेचे चित्र असेल
  5. देवनागरी लिपीत 20 अंक असेल

दरम्यान, सध्या ज्या 20 रुपयांच्या नोटा चलनात आहेत, त्याही सुरुच राहतील. याआधी नोटाबंदीनंतर 2000, 500, 200, 100, 50 आणि 10 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या होत्या. आता त्यात 20 रुपयाच्या नोटांची भर पडली आहे.