युरोप टूरवर हॉटेलमध्ये भूत दिसल्याने सुशांतचा थरकाप, इटलीहून अर्ध्यावर परतलो, रियाचा दावा

ऑक्टोबर 2019 मध्ये रिया, सुशांत आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोपला गेले होते, त्यावेळी ही घटना घडल्याचं रियाने सांगितलं.

युरोप टूरवर हॉटेलमध्ये भूत दिसल्याने सुशांतचा थरकाप, इटलीहून अर्ध्यावर परतलो, रियाचा दावा
अनिश बेंद्रे

|

Aug 12, 2020 | 12:38 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. युरोप टूरवर असताना सुशांतला हॉटेलमध्ये भूत दिसलं होतं आणि त्यानंतरच सुशांत नैराश्यात गेला, असा धक्कादायक दावा सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केला आहे. मुंबई पोलिसांना रियाने दिलेल्या जबाबातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये रिया, सुशांत आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोपला गेले होते, त्यावेळी ही घटना घडल्याचं रियाने सांगितलं. (Rhea Chakraborty Claims Sushant Singh Rajput Traumatized after Seeing Ghost in Italy Hotel)

रिया चक्रवर्तीने काय सांगितले?

“आम्ही इटलीच्या फ्लोरेन्स शहरातील एका 600 वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेलमध्ये मी आणि शोविक एका रुममध्ये राहिलो होतो तर सुशांत वेगळ्या रुममध्ये राहिला होता. काही कामानिमित्त मी आणि शौविक हॉटेलमधून बाहेर गेलो होतो. काही तासांनी आम्ही दोघे हॉटेलमध्ये परत आलो, तेव्हा सुशांत हॉटेलच्या एका कोपऱ्यात बसून रुद्राक्ष माळेचा जप करत होतो. यावेळेस सुशांत खूप घाबरला होता. तो थरथर कापत होता. त्याला घाम फुटला होता. हे पाहून मी आणि शौविकने सुशांतला रुममध्ये नेले” असे रियाने सांगितले.

“आम्ही सुशांतला तुझी अशी अवस्था का झाली याबाबत विचारणा केली. तेव्हा सुशांतने एक धक्कादायक घटना सांगितली. ज्या हॉटेलमध्ये आम्ही तिघे थांबलो होतो त्या हॉटेल मध्ये गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराचे पेंटिंग होते. ज्यात एक राक्षस एका मुलाला खातानाचे चित्र रेखाटले होते. ती पेंटिंग पाहून सुशांत खूप घाबरला होता आणि त्याला त्या पेंटिंगमधलं भूत दिसत होतं. तो त्याला बोलवत होता, असं सुशांतने आम्हाला सांगितलं. तो प्रचंड घाबरला होता. मी आणि शोविकने सुशांतला कसंबसं सांभाळलं. त्यानंतर आम्ही लगेच ते हॉटेल सोडले” अशी माहिती रियाने दिली.

“इटलीनंतर आम्ही तिघे ॲास्ट्रियाला गेलो. तिथे आम्ही बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी 4 दिवसांचे बुकिंग केले होते. मात्र आपल्याला भीती वाटत आहे, आपण परत मुंबईला जाऊ, असं वारंवार सुशांत मला सांगत होता. तो खूप घाबरलेला होता. आम्हाला काहीच सुचत नव्हते. सुशांतची तब्येत बिघडू लागली होती. आमची युरोप टूर 2 नोव्हेंबर 2019 रोजी संपणार होती, मात्र ती मध्येच सोडून आम्ही 28 ऑक्टोबरलाच मुंबईला परत आलो.” असे रियाने सांगितले.

“सुशांत घरी गेल्यावरही सतत बेडरुममध्येच असायचा. अधूनमधून सुशांतच्या ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज यायचे. हे काही दिवस असंच सुरु राहिलं. म्हणून आम्ही मानसोपचार तज्ञांकडे गेलो. पण सुशांतला बरं वाटतं नसल्याने आम्ही मानसोपचार तज्ञ बदलत राहिलो.” असा दावा रिया चक्रवर्तीने केला आहे.

“मे महिन्याच्या अखेरीस या भूतांच्या घटनेवरुन सुशांत खूपच चिडचिड करु लागला होता. तो सतत माझ्याशी भांडायचा. 8 जूनच्या रात्री याच विषयावरुन आमचे कडाक्याचे भांडण झाले. शेवटी मी सुशांतच्या घरुन जावं, असं सुशांतने मला सांगितलं. हे सांगताना देखील सुशांत माझी किती काळजी करतो, माझ्यावर किती प्रेम करायचा हे मला दिसलं. तो मला बोलला माझ्या डिप्रेशनमुळे तुझं आयुष्य खराब होतंय, तुलाही याचा त्रास होतोय, त्यामुळे तू माझ्यापासून दूर रहा” असा दावा रियाने केला. (Rhea Chakraborty Claims Sushant Singh Rajput Traumatized after Seeing Ghost in Italy Hotel)

“याच मुद्दायावरुन आमचे आणखी कडाक्याचे भांडण झाले आणि मी माझी बॅग घेऊन सुशांतच्या घरातून निघून गेले. या सगळ्यामुळे मलाही खूप नैराश्य आले होते. म्हणून मीदेखील एका मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला. 8 जून ते 14 जून दरम्यान मी आणि सुशांत अजिबात संपर्कात नव्हतो. पण 10 जूनला सुशांतने शोविकला एक मेसेज करुन माझ्या तब्येतीबद्दल विचारणा केली होती. 14 जूनला जी दुःखद बातमी आली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं सर्वस्व गेलं होतं.” असं रियाने सांगितलं.

संबंधित बातम्या :

तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

सिद्धार्थ पिठानीसोबत बहिणीच्या वर्तनावर सुशांत नाखुश, रिया चक्रवर्तीकडून व्हाॅट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

(Rhea Chakraborty Claims Sushant Singh Rajput Traumatized after Seeing Ghost in Italy Hotel)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें