Rhea Chakraborty ED | तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे (Sushant Father Chat with Rhea Chakraborty).

  • सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 10:50 AM, 11 Aug 2020
Rhea Chakraborty ED |  तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे (Sushant Father Chat with Rhea Chakraborty). सुशांतच्या वडिलांनी नोव्हेंबर 2019 मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मेसेज केला होता. यात त्यांनी मी सुशांतचा वडील आहे हे तुला माहिती आहे, तर तू माझ्यासोबत बोलली का नाहीस? अशी विचारणा रियाकडे केली होती.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीला 29 नोव्हेंबर 2019 ला मेसेज करुन चॅटिंग केली होती. ती समोर आल्याने सुशांत प्रकरणात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या वडिलांनी रियाला या चॅटिंगमध्ये विचारलं होतं, ‘मी सुशांतचा वडील आहे हे तुला माहिती आहे तर तू माझ्यासोबत बोलली का नाहीस? अखेर अशी काय गोष्ट आहे? जर तू मित्र म्हणून त्याची देखभाल करत असेल तर माझेही कर्तव्य आहे. सुशांतबद्दल मला सगळी माहिती मिळाली पाहिजे. यासाठी तू मला फोन करुन माहिती दे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सुशांतच्या वडिलांच्या या मेसेजला रियाने मात्र, कोणतंही उत्तर दिलं नाही. विशेष म्हणजे सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या टीममधील आणखी एक सहकारी श्रुती मोदी हिच्याशीही संपर्क केला होता. श्रुतीला फोन करुन त्यांनी सुशांतबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चौकशी केली होती. पण श्रुतीनेही त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. मुंबई पोलिसांच्या तपासात हे उघड झालं. त्यामुळे मुंबई पोलीस या अंगाने देखील तपास करत आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तसेच महाराष्ट्र व बिहार सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. रिया, तिचे वडील आणि भाऊ यांची काल ईडी कार्यालयात जवळपास 10 तास चौकशी झाली.

रिया चक्रवर्तीचे प्रतिज्ञापत्र

रिया चक्रवर्तीने आज सुनावणी होण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. पाटण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी कोणताही आधार नाही. ही केस मुंबई पोलिसांकडे ट्रान्स्फर होऊ नये म्हणून सीबीआयकडे तपास देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय हे करता येणार नाही, असे रियाचे म्हणणे आहे. मात्र तिने असेही म्हटले आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वतीने सीबीआयकडे चौकशी सुपूर्द केली तर आपला कोणताही आक्षेप नाही.

सीबीआय आणि ईडीच्या कार्यप्रणालीवरही रियाने प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, की पाटण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने सुशांतच्या बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरु केली. दुसरीकडे सीबीआयनेही त्वरित गुन्हा दाखल केला. मात्र बरीच मोठी प्रकरणे आहेत, ज्यांचा तपास या एजन्सीज करत नाहीत. मात्र यावेळी दोघेही विद्युतवेगाने कामाला लागले.

“मी मीडिया ट्रायलची शिकार”

प्रतिज्ञापत्रात संपूर्ण प्रकरणाच्या मीडिया ट्रायलचाही तिने उल्लेख केला आहे. मीडियाने आपल्याला आधीच दोषी ठरवले आहे. पहिल्या टूजी आणि आरुशी तलवार प्रकरणात ज्यांना मीडियाच्या वतीने दोषी ठरवण्यात आले होते, ते निर्दोष ठरले होते. सुशांतनंतरही काही कलाकारांनी आत्महत्या केली आहेत, पण माध्यमांना या प्रकरणातच रस आहे. या प्रकरणात अतिशयोक्ती केली जात आहे. मी सुरुवातीपासूनच अस्वस्थ आहे, आणि आता आपले वैयक्तिक आयुष्य एक तमाशा बनले आहे, असे रियाने म्हटले आहे.

संबंधित व्हिडीओ :


संबंधित बातम्या :

लिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

Sushant Death Case | रियाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची 9 तास ईडी चौकशी, आता रियाचा नंबर

Sushant Father Chat with Rhea Chakraborty